घरमुंबईमुंबईचे वातावरण ढगाळ राहणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबईचे वातावरण ढगाळ राहणार; हवामान खात्याचा अंदाज

Subscribe

मुंबईची आर्द्रता ९४ टक्के एवढी नोंदविण्यात आली असून कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे मुंबईचे पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईची आर्द्रता शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही ९४ टक्के एवढी नोंदविण्यात आली असून कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर आहे. अशाच काहीशा बदलत्या तापमानामुळे मुंबईकरांचा त्रास अधिकच वाढला आहे. या बदलत्या वातावरणामुळे मुंबईकर त्रासले आहेत. त्यातच रविवारसह सोमवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवमान अंशत: ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

या ठिकाणी पावसाची नोंद

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण, गोव्यात हवामान कोरडे असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोकण, गोव्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

- Advertisement -

मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे

७ ते ९ एप्रिल दरम्यान, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

१० एप्रिल – मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -