घरलाईफस्टाईलजागतिक आरोग्य दिन: हेल्दी राहण्यासाठी नेमके काय करावे!

जागतिक आरोग्य दिन: हेल्दी राहण्यासाठी नेमके काय करावे!

Subscribe

जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या आरोग्य दिना निमित्त दैनिक दिनक्रमेमध्ये काय करावे, आणि काय करू नये? हे थोडक्यात जाणून घ्या.

जगभरात जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) दर वर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आयोजित करते. आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, नागरिकांना त्याच्या आरोग्याबद्दल जागरूत करता येईल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने १९४८ साली पहिला जागतिक आरेग्य सभा आयोजित केली होती. त्यानंतर १९५० पासून ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर आरोग्याला जोडलेली एक थीम निवडली जाते. २०१९ मध्ये ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ ही जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे. या आरोग्य दिना निमित्त सकाळी उठल्या पासून रात्री झोपण्यापर्यंत आरोग्याकडे कसे लक्ष दिले पाहिजे हे बघुया.

सकाळी उठल्यावर नेमके काय करावे?

दररोज सकाळी लवकर उठा. उठल्यानंतर सर्वप्रधम साधा किंवा कोमट पाणी पियावे. तर काही वेळी एक कप पाण्यामध्ये अर्धा लिंब पिळूनसुद्धा पाणी पिणे शरिरासाठी चांगले ठरते. त्यानंतर चांगल्या प्रकारे फेश व्हा. फ्रेश झाल्यानंतर १० ते १५ मिनीटांनी ग्रीन टी किंवा ताज जूस सुद्धा पिऊ शकता. तसेच कोणतेही फळ किंवा सुकामेवा मात्र खाले पाहिजे. मात्र, उठल्या उठल्या चहा पिऊ नका. कारण रात्रभर उपाशी शरिराला योग्य पोषण मिळत नाही. उठल्या नंतर चहा पियायची आहे तर ग्रीन टी किंवा सुकामेवा खाल्यानंतर अर्ध्या तासांनी चहा घ्या. तसेच सुकामेवा किंवा फळ खाऊन झाल्या नंतर आर्ध्या तासांनी ४५ मिनिट व्यायाम करा. त्यानंतर १५ मिनिट ब्रीदिंग आणि मेडिटेशन करा. मात्र, व्यायाम रिकाम्या पोठी करू नये. व्यायामाच्या पहिले फळ किंवा सुकामेवांचा चांगला आहार घ्यावा.

- Advertisement -

सकाळचे आहार

व्यायाम वेगरे झाल्यानंतर १० ते १५ मिनीट वेळ घेऊन स्वच्छ आंघोळ करा. आंघोळीसाठी साधा किंवा कोमट पाण्याचा वापर करा. मात्र, आंघोळासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. तसेच घाईघाईत आंघेळ करू नका. व्यायाम, योग्य प्रकारे आंघोळ केल्यानंतर योग्य आहार घ्यावा. सकाळचे आहार भर पेठ केले पाहिजे. तसेच शरिरास योग्य असणारा आहार घेतला पाहिजे.

रात्रीचा आहार

तसेच रात्रीचे जेवण हे दिवस भरातील सगळ्यात हलके जेवण असले पाहिजे. आपले शरिर सूर्याच्या दिनचरे सारख चालत. यामुळे दिवस संपल्या नंतर आपल्या शरिरातील मेटाबॉलिझम काम करायला सुरू करत. त्यामुळे जेवढी भूक असेल त्याच्या आर्ध रात्री आहार घेतला पाहिजे. त्यानंतर रात्रीचे जेवण केल्यानंतर १५ मिनिट तरी शतपावली केली पाहिजे. तसेच रात्रीची योग्य झोप घेणे गरजेचे असते. दररोज ७ ते ८ तास झोप ही झाली पाहिजे. योग्य वेळेत झोप घेतल्या आरोग्याच्या प्रश्न उपस्थित होत नाहीत. योग्य आहार, योग्य वेळेत झोप घेतल्यास आरोग्य हे अति उत्साहिरी राहिल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -