घरमुंबईMumbai Police : मुंबई पोलीसही होतायत टेक्नोसॅव्ही; नागरिकांसाठी शेअर केला खास व्हिडीओ

Mumbai Police : मुंबई पोलीसही होतायत टेक्नोसॅव्ही; नागरिकांसाठी शेअर केला खास व्हिडीओ

Subscribe

मुंबई : मुंबई पोलीस म्हटले की, खाकी वर्दी, शिस्त आणि नियम याच सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र मुंबई पोलीस पावसाळा असो वा उन्हाळा 24 तास नागरिकांच्या सेवेत तत्पर असतात आणि जमेल तशी मदत करत असतात. मुंबई पोलीस नेहमीच त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेबद्दल वेळोवेळी सांगत असतात अशातच आता मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करत नागरिकांप्रती आपलं प्रेम व्यक्त करताना त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ‘वी आर मुंबई पोलीस’ असे म्हणत मुंबई पोलिसांना ट्रेंड सुरू केला असून त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Mumbai police are also becoming techno savvy Special video shared for citizens)

हेही वाचा – Uddhav Thackeray : संघाचा निष्ठावंत माणूस, तरी यादीत नाव नाही; ठाकरेंचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

इंस्टाग्रामवरील मुंबई पोलिसांच्या व्हिडीओत पाहायला मिळते की, सुरुवातीला एक महिला ट्रॅफिक पोलीस येते आणि म्हणते की, आम्ही मुंबई पोलीस आहोत आणि आम्हाला माहीत आहे की, तुम्ही आम्हाला बघितल्यानंतरच हेल्मेट घालतात. तर त्यानंतर दुसरी ट्रॅफिक पोलीस येते आणि म्हणते की, आम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमचं लायसन्स पहिल्यांदाच विसरला नाही आहात. नंतर एकेक करून तीन पोलीस अधिकारी येतात आणि म्हणतात की, महिलांची सुरक्षा हेच आमचे पहिलं प्राधान्य आहे आणि अर्थातच मुंबई नेहमी सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेत असतो. आम्ही मुंबई पोलीस आहोत अर्थातच आम्ही तुम्हाला संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका याची वारंवार आठवण करून देत असतो. व्हिडीओच्या शेवटी मुंबई पोलीस सर्व मुंबईकरांवर प्रेम करतात आणि सर्व मुंबईकर आमच्यावर प्रेम करतात, असे सांगताना दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

हेही वाचा – BJP : भाजपाला 24 तासांत दोन धक्के; भोजपुरी स्टारनंतर “या” उमेदवाराचाही निवडणूक लढण्यास नकार

- Advertisement -

इंस्टाग्रामवरील व्हिडीओला “तुम्ही मुंबईकर आहात आणि अर्थातच आपत्कालीन परिस्थिती आल्यावर तुम्ही 100 क्रमांक डायल करू शकता,” अशी कॅप्शन देऊन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. @mumbaipolice या इंस्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ पाहून नेटकरी मुंबई पोलिसांवर असणारे त्यांचे प्रेम कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने पोलिसांच्या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटले की, “इंस्टाग्राम ॲपवरील हे माझं सगळ्यात आवडते अकाउंट आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -