घरमुंबईसेल्फीच्या नादात गमावला जीव; मुंबई पोलिसांचे व्हिडिओद्वारे आवाहन

सेल्फीच्या नादात गमावला जीव; मुंबई पोलिसांचे व्हिडिओद्वारे आवाहन

Subscribe

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीवर सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.

जिवघेण्या जागेवर उभे राहून सेल्फि काढण्याच्या नादामध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून वारंवार प्रयत्न केले जातात, आवाहन केले जाते. मात्र लोकांना त्याचा विसर पडतो. याची आठवण करन देण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही धक्का बसेल असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीवर सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओमध्ये एक तरुण उंच इमारतीच्या टेरेसवर आहे. टेरेसच्या टोकावर उभा राहून हा तरुण सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अचानक त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. असे जिवघेणे साहस करुन नका असे आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी केले आहे. असा चित्तथरारक व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. मात्र सहन होणाऱ्यांनीच हा व्हिडिओ पहा असे पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करुन त्यांनी असे लिहिले आहे की, काय हा एक धाडसी सेल्फी घेण्याचा प्रयत्न होता? किंवा एक गैरजबाबदार धाडस? हा प्रयत्न काहीही उद्देशाने असूदे मात्र हा प्रयत्न जीव धोक्यात घालण्या सारखा आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत मुंबई पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ टाकून मुंबई पोलिसांनी लोकांना धोकादायक ठिकाणावरुन सेल्फी काढण्यापासून जागृक करण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जी भाषा ऐकू येत आहे ती भारतातील नाही. त्यामुळे हा व्हिडिओ मुंबई मधला नाही हे स्पष्ट आहे. याबाबतची अधिक माहिती मुंबई पोलिसचं देऊ शकतात. या व्हिडिओ बाबतची सत्यता पडताळल्यानंतर हा व्हिडिओ २४ एप्रिल रोजी चीनमधील एका वेबसाईटने अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये जी भाषा ऐकू येत आहे ती भाषा चीनी भाषेशी मिळतीजुळती असल्याचे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -