घरमनोरंजन'ठाकरे'नंतर आलेल्या तिरकस प्रश्नांना नवाजुद्दीनने असे दिले उत्तर

‘ठाकरे’नंतर आलेल्या तिरकस प्रश्नांना नवाजुद्दीनने असे दिले उत्तर

Subscribe

ठाकरे नवाजुद्दीनने काम केल्यापासून सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना नवाज यांनी अरबाज खानच्या क्विक हिल पिंच या कार्यक्रमात उत्तरं दिले आहेत.

बॉलिवूडच्या सर्वांत बुद्धीमान अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या कलाकारांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव नेहमी पहिले घेतले जाते. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ठाकरे या चित्रपटात नवाजुद्दीन शेवटचे काम केले होते. यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नवाजुद्दीनने काम केल्यापासून सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना नवाज यांनी अरबाज खानच्या क्विक हिल पिंच या कार्यक्रमात उत्तरं दिले आहेत.

या शो दरम्यान, अरबाजने नवाजला असा प्रश्न विचारला की, ‘तुम्ही ठाकरे चित्रपट केला त्यावेळी सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. जसे की, तुमच्या कडून अशी अपेक्षा नव्हती. तर दुसरी प्रतिक्रिया अशी होती की, जेव्हा पासून ठाकरेंची व्यक्तिरेखा साकारली तेव्हा पासून द्वेष निर्माण झाला आहे.’ यावर नवाज असे बोलले की, ‘मी फक्त एक अभिनेता आहे. जी भूमिका माझ्या वाट्याला येईल ती मी साकारत असतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

- Advertisement -

नवाज यांनी असे ही सांगितले की, ‘मी एक अभिनेता आहे, मी प्रत्येक भूमिका साकारणार. खूप सारे तटस्थ लोकं ही असतात. त्यांनी ही मला हा प्रश्न विचारला की, मी ठाकरेंची भूमिका का साकारली? त्यांना मी उत्तर नाही देऊ शकत. कारण ते पहिलेपासूनच समजदार आहे. समजदार माणसांना मी समजवू शकतो,पण ते ही समजू शकत नाही.’
‘त्यापैकी काहींनी विचारले तुम्ही ही भूमिका का केली? त्यावर मी सांगितले, तुम्ही तर समजदार आहात.मी एक कलाकार आहे. माझ्या आयुष्यात ३० वर्ष फक्त अभिनय केला आहे. अभिनयाबद्दलच नेहमी विचार करत असतो. अभिनय माझे पहिले काम आहे’

- Advertisement -

‘मला कोणतीही भूमिका करायला मिळाली तर मी करणार. चित्रपटातून मला जज करत असाल तर मी गणेश गायतोंडेची भूमिका ही साकारतो. मी सगळ्या प्रकारची व्यक्तीरेखा करू इच्छितो मला कोणत्याही भूमिकेत अडकून राहायचे नाही.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -