घरमुंबईसोनूच्या सतर्कतेमुळे पकडला गेला मोबाईल चोर

सोनूच्या सतर्कतेमुळे पकडला गेला मोबाईल चोर

Subscribe

दारूच्या नशेत असणाऱ्या लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला चर्चगेट पोलिसांनी काल मरीन लाईन्स स्टेशनवर जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन चाकू आणि ब्लेड्स जप्त करण्यात आले असून दारूच्या नशेत शुद्ध हरपलेल्या लोकांचे मोबाईल चोरण्याचे काम आरोपी करत होता. मरिन लाईन्स स्टेशनवर एका इसमाचा मोबाईल चोरी करत असताना सोनू पंकज जैन या तरुणाने आरोपीला पहिले असता त्याला पकडण्यासाठी तो धावून गेला. सोनू जैनच्या पत्नीवर सुद्धा आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सोनूने त्याला सोडले नाही. प्रेम मोहन जोशी (२२) असे आरोपीचे नाव असून तो मरीन लाईन्स स्टेशनवरच्या फुथपाथवरच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोनू जैन हा अंधेरीवरून चर्चगेटच्या दिशेने येत होता. त्यावेळी त्याला आरोपी चोरी करत असल्याचे दिसले. पोलिसांच्या वेळेवर मिळालेल्या सहकार्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी लोकांच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावून बेशुद्ध करून त्यांची लूट करतो, असा आरोप सोनूने केला होता. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. आरोपी फक्त नशेत असलेल्या व्यक्तींना लुटत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रेल्वे पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली असूनसुद्धा अश्या घटनांना आळा बसताना दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -