घरCORONA UPDATEचांगली बातमी: इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक

चांगली बातमी: इमारतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक

Subscribe

मुंबईतील वाढत्या कोरोना कोविड १९ या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रायोगित टप्प्यात तीन विभाग कार्यालयांच्या हद्दीतील लोकांच्या केलेल्या सर्वेमध्ये इमारतीपेक्षा झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीजेच प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. मुंबई महापालिकेने शहरातील अँटॉप हिल वडाळा या एफ-उत्तर, पश्चिम उपनगरातील दहिसर या आर- उत्तर आणि चेंबूर-टिळक नगर या एम-पश्चिम विभागात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वे करण्यात आला होता. मात्र, या सर्व्हे अभ्यासातील अहवालात संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण अर्थात मास्क लावणे इत्यादी तत्सम उपाययोजना प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड २’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान, ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत.

- Advertisement -

या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्या्चे (ऍन्टी्बॉडीज) प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी नमूना निवड पध्दतीनुसार नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार, तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यार करण्यासाठी दोन फेऱ्यांद्वारे सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी सर्वेक्षणाची पहिली फेरी ही जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती. आता याच संशोधनांतर्गत दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षण करण्यासत आले आहे.

पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली.

- Advertisement -

तर याच सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरीत ५ हजार ८४० एवढया लक्ष्य नमुन्यां पैकी ५ हजार ३८४ नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी ७२८ व्यक्ती कार्यरत होत्या. दुस-या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते.

झोपडपट्टी परिसरात संसर्गात घट

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांची संख्या (Reported Cases) याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुसऱ्या फेरी दरम्यान बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये आंशिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण तुलनेने कमीच

झोपडपट्टी परिसरातील लोकसंख्येमध्ये आढळून आलेल्या ऍन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांमध्ये ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचा-यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे. बरे झालेले रुग्ण व लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधी नंतर ऍन्टीबॉडीज पातळी ही घसरते; ही बाब दोन्ही फे-यांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -