घरमुंबईमुंबईकरांनो सावधान! बाहेरचे खाद्यपदार्थ ठरतील घातक

मुंबईकरांनो सावधान! बाहेरचे खाद्यपदार्थ ठरतील घातक

Subscribe

वाढतोय गॅस्ट्रो आणि कावीळचा कहर

पावसाळा सुरू झाला की, अनेक पावसाळ्यासंबंधित होणारे आजार डोके वर काढतात. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा वाढता जोर आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वेगवेगळे आजार पसरण्याची शक्यता असते. मुंबईत जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली असली तरीही या कालावधीत पावसाळी आजार बळावलेले दिसतात. मुंबईत सध्या गॅस्ट्रो आणि हेपेटायसिस (कावीळ) या आजारांचा वाढता कहर असल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाच्या सुरुवातीच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये पावसाळ्या संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. १ ते ३० जून २०१९ या कालावधीदरम्यान मुंबईकरांना सर्वात जास्त गॅस्ट्रोचा त्रास झाला. तर, गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत सर्वात जास्त यंदा हेपेटायसिस या आजाराने मुंबईकर त्रस्त आहेत. आतापर्यंत एकूण ७७७ रुग्णांना ग्रॅस्ट्रोमुळे मुंबईतील अनेक पालिका हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागले आहे. तर, हेपेटायसिसच्या २८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात हेपेटायसिसचे ९४ रुग्ण आढळले होते. त्यामुळे आकडेवारीनुसार, हेपेटायसिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

कुर्ला परिसरात हेपेटायसिसचे रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढले आहेत. यंदाच्या जून महिन्यात कुर्ला या एकट्या वॉर्डमध्ये एकूण ३०४ हेपेटायसिसचे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नव्हे तर, पालिकेच्या २४ नंबरच्या वॉर्डमध्ये ६४३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी जून महिन्यात आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या १६९ इतकी आहे. याशिवाय, एल वॉर्डमधून हेपेटायसिस ए आणि ई चे ही रुग्ण आढळले आहेत. ज्यात संभाजी चौक, बुद्ध कॉलनी, एलआयजी, एमआयजी, सीएसटी रोड, मशरानी लेन, कुर्ला गार्डन परिसराचा समावेश आहे.शिवाय, रमजान कालावधीदरम्यानही अनेक खाद्यपदार्थ रस्त्यावर उपलब्ध होतात. त्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यानेही रुग्णांत भर पडली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, नागरिकांनी बाहेरचे अन्न पदार्थ, ज्यूसचो सेवन करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजार           २०१८             २०१९
डेंग्यू              २१                  

मलेरिया         ३९२                ३१०

- Advertisement -

लेप्टो               ५                  

गॅस्ट्रो             ७७९              ७७७

हेपेटायटिस      ९४                २८२  

हेपेटायटिसला प्रतिबंध करण्यासाठी-

-शौचाला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणे.

-जेवण बनवताना आणि जेवणाआधी हात धुणे.

-उकळलेलं पाणी प्या. वैयक्तिक स्वच्छता राखा.

-हिरव्या पालेभाज्या धुवून घ्या. गरोदर महिलांनी योग्य ती काळजी घ्यावी.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -