घरमुंबईमुंबईत लेप्टोचा धोका वाढला ! मृतांचा आकडा ४ वर?

मुंबईत लेप्टोचा धोका वाढला ! मृतांचा आकडा ४ वर?

Subscribe

जून महिन्यात लेप्टोचे ५ रुग्ण आढळले होते. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता. लेप्टोसोबत जून महिन्यात गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.

पावसाळा सुरु झाला की, आपोआप आजार डोकं वर काढत असतात. सध्या मुंबईत लेप्टोस्पायरोसिसने डोकं वर काढले आहे. जूनपर्यंत मुंबईत लेप्टोची लागण होऊन तिघांचा मृत्यू झाला होता. आता जुलै महिन्यातही लेप्टोमुळे आणखी एक रुग्ण दगावला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील विश्लेषण समितीने या मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांनी लेप्टोपासून जरा जपूनच! अस्वच्छ पाण्यातून लेप्टोची लागण होते. त्यामुळे मुंबईत साचणाऱ्या पाण्यापासून सावधान!

वाचा- मुंबइकरांनो काळजी घ्या, लेप्टोचा तिसरा बळी

साचलेल्या पाण्यातून झाला लेप्टो

वरळीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाला लेप्टोची लागण झाली होती. पावसाच्या साचलेल्या पाण्यात राहिल्यानंतर त्याला ताप आला. ३ दिवस तो तापाने फणफणला होता. महापालिकेच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

आणखी एक लेप्टोचा बळी?

मुंबईतल्या सायनमधील खाजगी रुग्णालय सोमय्यामध्येही लेप्टोच्या एका रुग्णाची नोंद करण्यात आली असल्याची बातमी आहे. मात्र याबाबत पुढील कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

इतक्या जणांना लेप्टोची लागण

गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०१७ मध्ये जुलै महिन्यात लेप्टोची लागण होऊन ३ बळी गेले होते. पण जुलै २०१८ च्या १५ दिवसांच्या कालावधीत एका मृत्यूची नोंद झाली आहे. तर, १९ जणांना लेप्टोस्पायरोसिस झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

आजारांनी काढलं डोकं वर

मुंबईत आतापर्यंत लेप्टोस्पायरोसिसमुळे चार रुग्ण दगावले आहेत. जून महिन्यात लेप्टोचे ५ रुग्ण आढळले होते. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता. लेप्टोसोबत जून महिन्यात गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. जून महिन्यात गॅस्ट्रोचे ७७९ आणि मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले आहेत.

वाचा- मुंबईत लेप्टोचा दुसरा बळी; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

लेप्टोची  लक्षणे 

मलेरिया, डेंग्यु सारखीच लेप्टोस्पारोसिसची लक्षणे आहेत. लेप्टोचा जीवाणू शरिरात गेल्यानंतर दोन ते तीन दिवसांने ताप येण्यास सुरुवात होते. तर कधी-कधी या आजाराची लक्षणे दिसून देखील येत नाही. थंडी वाजणे, तीव्र ताप येणे, उलट्या होणे, डोळे लालसर होणे, थकवा येणे, घसा खवखवणे, अतिसार, काविळ होणे, सांधे दुखणे, डोके दुखी, पाय दुखणे, अंगावर पुरळ येणे ही लक्षणे पहिल्या टप्प्यात दिसून येतात. तर कधी-कधी ही लक्षणे अचानक दिसू लागतात. काही रुग्ण पहिल्या टप्प्यात बरे होतात. तर काही रुग्णांचा आजार बळावतो.

गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ 

१ ते १५ जुलै या कालावधीत गॅस्ट्रोच्या ५१९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर , मलेरियाचे १९२ रुग्ण आढळले आहेत.  ३६९ संशयास्पद डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत. तर १६ जणांना डेंग्यूचे निदान झाल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात लेप्टोचे ५ रुग्ण आढळले होते.  त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला. लेप्टोसोबत जून महिन्यात गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. जून महिन्यात गॅस्ट्रोचे ७७९ आणि मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -