घरदेश-विदेशदिल्लीत एअर हॉस्टेसची आत्महत्या की हुंडाबळी?

दिल्लीत एअर हॉस्टेसची आत्महत्या की हुंडाबळी?

Subscribe

दिल्लीतील पंचशील पार्क येथे अनिशिया बत्रा या ३९ वर्षीय एअर हॉस्टेसने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून हुंड्याबळी असल्याचा आरोप अनिसियाच्या कुटुंबियांनी केला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ३९ वर्षीय एअर हॉस्टेसने शुक्रवारी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अनिसिया बत्रा असे या एअर हॉस्टेसचे नाव असून ती पंचशील पार्क येथे राहत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या पतीला मोबाईलवर मेसेज पाठवला होता. पण, ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी हत्या असल्याचा आरोप अनिसियाच्या कुटुंबियांनी केला आहे. अनिसियाने अडीच वर्षापूर्वी पेशाने इंजिनिअर असलेल्या मयांक सिंघवीशी लग्न केले होते. त्यानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरू असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळेच अनिसियाने टोकाचे पाऊल उचलले असून तिच्या पतीला अटक करण्याची मागणी अनिसियाच्या कुटुंबियांनी केली आहे. पण, प्रथमदर्शनी ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शिवाय, या प्रकरणामध्ये अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेले नाही. तसेच अनिशियाने केलेल्या आत्महत्येपूर्वी केलेल्या मेसेजमध्ये देखील संशयास्पद काहीही नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

एअर हॉस्टेसचा हुंडाबळी?

अनिशिया बत्राचे वडील हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. अनिशिया ही लुप्तांसा एअरलाईन्समध्ये कामाला होती. हुंड्यासाठी अनिशियाचा नवरा मयांक आणि सासूकडून छळ सुरू होता. शिवाय, बऱ्याच वेळा तिला घरामध्ये कोंडून देखील ठेवले जात होते असा आरोप अनिशियाच्या भावाने केला आहे. मागील महिन्यामध्ये अनिशियाच्या वडीलांनी हौज खास पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार करत अनिशियाचे काही बरे – वाईट झाल्यास मयांक सिंघवीला जबाबदार धरावे असे म्हटले होते. दरम्यान, ही आत्महत्या नसून हुंडाबळी असल्याचा आरोप अनिशिया बत्राच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र पोलिसांनी केवळ मयांक सिंघवीवरच विश्वास ठेवल्याचा आरोप एअर हॉस्टेसच्या कुटुंबियांनी केला आहे. शुक्रवारी ४.३० वाजता मयांकला अनिशियाने आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. त्यानंतर मयांक धावत गच्चीच्या दिशेने गेला. मात्र गच्चीच्या दरवाज्याला आतून कडी लावण्यात आली होती. त्यानंतर मयांक धावत तळमजल्याकडे आला. तोवर सारं काही संपले होते. अनिशियाने उडी मारून आपले जीवन संपवले होते. असे अनिशियाचा पती मयांक सिंघवी यांने सांगितले. अनिशियाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून तिच्या कुटुंबियांनी मात्र पुन्हा एकदा व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदनाची मागणी केली आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणामुळे दिल्लीत अनिशियाने आत्महत्या केली की तो हुंडाबळी आहे असा प्रश्न चर्चिला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -