घरमुंबईबक्षीस योजनेनंतर दिवसाला ९१ टक्के खड्डे बुजवले; पण बक्षिसाचा लाभार्थी कुणीच नाही!

बक्षीस योजनेनंतर दिवसाला ९१ टक्के खड्डे बुजवले; पण बक्षिसाचा लाभार्थी कुणीच नाही!

Subscribe

मुंबईतील रस्त्यांवरील मोठे खड्डे दाखवा आणि तक्रारींनंतर २४ तासांमध्ये खड्डा न बुजल्यास ५०० रुपयांचे बक्षीस घेऊन जा,अशी योजना जाहीर केल्यानंतर दिवसाला ९१ टक्के खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील मोठे खड्डे दाखवा आणि तक्रारींनंतर २४ तासांमध्ये खड्डा न बुजल्यास ५०० रुपयांचे बक्षीस घेऊन जा, अशी योजना जाहीर करणार्‍या महापालिकेने अद्यापही एकालाही बक्षिसाची रक्कम दिलेली नाही. ही योजना जाहीर केल्यानंतर दिवसाला ९१ टक्के खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. त्यामुळे उर्वरीत ९ टक्के खड्डे काही यंत्रणांमधील समन्वयाअभावी बुजले गेले नसले तरी, ते खड्डे न बुजवल्यामुळे बक्षिसाची रक्कम किती तक्रारदारांना दिली याची माहिती प्रशासनाला देता आलेली नाही. मात्र, जे खड्डे बुजवले आहे, त्याकरता तक्रारदारांना फोन करून त्यांचे समाधान झाले का याबाबतची विचारणा आणि खातरजमा करण्यासाठी वाहतूक विभागाच्या चार अभियंत्यांना नियुक्त केले जाणार असल्याचेही रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

४४ हजार ५०० रुपये बक्षीस द्यावे

मुंबईतील रस्त्यांवरील मोठ्या आकाराचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासनाने बक्षीस योजना जाहीर केल्यानंतर माय पॉटहोल फिक्सिट या अ‍ॅपवर ६ तारखेपर्यंत ८७९ खड्डयांच्या तक्रारी आल्या होत्या. तर इतर टोलफ्रि क्रमांकावरून ४२५ अशाप्रकारे तब्बल १ हजार ३०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यातील काही खड्डे बुजवले असले तरी ८५ खड्डे २४ तासांमध्ये बुजवले गेलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांना महापालिकेने ४४ हजार ५०० रुपये एवढी बक्षीसाची रक्कम द्यावी लागणार असून ही रक्कम कुठे मिळेल म्हणून तक्रारदार विचारणा करत आहेत. त्यामुळे ही रक्कम कोण देणार आहे, कुणाच्या खिशातून दिली गेली आहे का?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे विचारणा केली.

- Advertisement -

खड्डयांच्या तक्रारी वर्ग करताना अडचणी

यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी योजना जाहीर झाल्यानंतर १ हजार ६७० खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील ९१ टक्के तक्रारींचा निपटारा २४ तासांमध्ये करण्यात आला. तर उर्वरीत ९ टक्के एवढ्या तक्रारींपैकी खड्डे हे जलअभियंता आणि मलनि:सारण विभागातील आहेत. या योजनेमुळे अधिकार्‍यांवरील जबाबदारी निश्चित झाली. तर सुरुवातील खड्डयांच्या तक्रारी वर्ग करताना अडचणी आल्या असल्या तरी आता मात्र, योग्यप्रकारे खड्डे बुजवले जात आहेत, असे सांगितले.

जर बक्षिसाची रक्कम देता येत नसेल तर बक्षीस योजना जाहीर का करता, असा सवाल करत भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी काळ्या यादीतील कंत्राटदारांवर वचक कशी ठेवणार, अशी विचारणा केली. तर भाजपच्या ज्योती अळवणी यांनी प्रशासनाने ९१ टक्के खड्डे बुजवल्याचे मान्य केले. पण नगरसेवकांनी ज्या तक्रारी केल्या, तेव्हा ते बुजवले नाही. मग आताच अशी कोणती फास्ट यंत्रणा प्रशासनाकडे आली आहे. तसेच बुजवलेल्या खड्डयांच्या दर्जाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. तर सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी अद्यापही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवकांचा विरोध असतानाही कोल्डमिक्सचा वापर केला जातो, असा सवाल केला. २४ तासांमध्ये खड्डे न बुजवल्याने किती लोकांना बक्षिसाची रक्कम दिली जावी, एवढीच माहिती सदस्य मागत असताना प्रशासन ही माहिती का लपवत आहे, असा सवाल राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. त्यामुळे अखेर हा हरकतीचा मुद्दा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवला.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीहून प्रतिसाद मिळेना!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -