घरमुंबईशाळेजवळील जंकफूडच्या जाहिरातीवर बंदी

शाळेजवळील जंकफूडच्या जाहिरातीवर बंदी

Subscribe

शाळेजवळील लावल्या जाणाऱ्या जाहिरांतींवर अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं बंदी लावणार आहेत.

शाळेजवळ लावल्या जाणाऱ्या जाहिरांतींवर आता बंदी लावण्यात येणार आहेत. अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने तसे आदेशच काढले आहेत. जंक फूड आरोग्यासाठी घातक आहे हे माहित असूनही पालक आपल्या मुलांना सर्रास जंक फूड देतात. त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचारही करत नाहीत. पण, आता या जाहिरातीवर बंधन घालण्यात येणार आहेत. शाळेबाहेर किंवा गार्डनजवळ लावलेल्या जंक फूडच्या जाहिराती आकर्षक असतात. त्यामुळेच मुलं जंक फूडकडे आपोआप आकर्षित होतात. म्हणून या जाहिराती बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेजवळ ५० मीटर परिसरात जंक फूडच्या जाहिराती आणि विक्रीवर बंदी घालण्याचा विचार अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाकडून केला जात आहे.

देशभरात ही बंदी लागू केली जाईल

अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने याबाबत लोकांकडून डिसेंबर महिन्यापर्यंत सूचना मागवल्या आहेत. लोकांकडून आलेल्या सूचनांचा विचार केल्यानंतर देशभरात ही बंदी लागू केली जाईल. इनबॉडी इंडियाच्या क्लिनिकल डायटीशियन अंकिता घाग म्हणाल्या, “शाळेजवळच्या ५० मीटर परिसरात जंक फूड किंवा अनहेल्थी फूड्सच्या ज्या जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय एफएसएसआयएकडून घेतला गेला तर तो फार उत्तम असेल. शाळेजवळ जंक फूडच्या जाहिरीती असल्याने मुलं त्या बघून लगेच आकर्षित होतात आणि असे खाद्यपदार्थ खाण्याचा त्यांना मोह होतो. यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं आहे. जे आरोग्यासाठी घातक आहे.”

- Advertisement -

शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या जाहिराती लावण्यास बंदी

अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाने तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे, जंक फूड बनवणाऱ्या कंपन्या शाळेच्या आवारात किंवा ५० मीटर परिसरात जंक फूडच्या जाहिराती करू शकणार नाहीत. एवढचं नव्हे तर जंक फूड मुलांना मोफतही देवू शकणार नाहीत. जून महिन्यात अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाकडून या बंदीबाबत विचार केला जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. तेव्हापासून हा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मंजूरीसाठी होता.

शाळेत पौष्टीक अन्नपदार्थ सेवनावर भर देण्याची सूचना

शाळांनी मुलांना पौष्टीक अन्न सेवनाबाबत माहिती दिली पाहिजे. मुलांना आरोग्यासाठी चांगलं अन्न खाण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, अशी सूचना या मसुद्यात अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने तब्बल २५ हजार शाळांना शाळेत पौष्टीक अन्नपदार्थ सेवनावर भर देण्याची सूचना केली आहे. याबाबत एफडीएने शाळेतीत शिक्षकांसोबत कार्यशाळाही घेतल्या आहेत.

- Advertisement -

जंक फूडमुळे काय होईल?

जंक फूडमध्ये अतिप्रमाणात साखर आणि मीठ असतं. जंक फूडच्या अति सेवनामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. भारतात १४.४ दशलक्ष मुलं लठ्ठपणाने ग्रस्त आहेत.


हेही वाचा – भिवंडीत डेंग्यूने डोके वर काढले, पालिकेचं कोरड्या दिवसाचं आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -