घरमनोरंजनPushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगवर कारवाई करण्याची महापालिका कर्मचाऱ्यांची मागणी, काय...

Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगवर कारवाई करण्याची महापालिका कर्मचाऱ्यांची मागणी, काय आहे प्रकरण?

Subscribe

मुंबई : मराठा समाजासाठी सध्या राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात सुरुवातीपासून काही ना काही अडचणी येत आहेत. त्यातच आता या सर्व्हेक्षणाच्या अंतर्गत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांवरून वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. मराठी सिने कलाकार पुष्कर जोग यांनी मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जात विचारली म्हणून सोशल मीडियावर अपमानास्पद विधान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेतील कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुष्कर जोग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोग आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे. अन्यथा पुष्कर जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कामगार संघटनांमार्फत देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती, म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे. (Municipal employees demand action against actor Pushkar Jog)

हेही वाचा… मराठा समाज आरक्षणासाठी पनवेलमधील ७९ हजार कुटूंबांचे सर्वेक्षण

- Advertisement -

राज्यात मराठा आरक्षणाच्या विषयाने जोर धरल्यावर राज्य सरकारने मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः मराठा कुणबी कोण कोण आहेत, याचा शोध सर्वेक्षणाच्या मार्फत घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने मुंबईसह राज्यात 23 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. मुंबई महापालिकेने अभियंते, कर्मचारी यांनाही सर्वेक्षणाच्या काम दिले आहे. त्यावरून अभियंता संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. अभियंत्यांना सर्वेक्षण कामासाठी नेमल्याने त्याचा मुंबईमधील विविध विकास कामांवर, अभियांत्रिकी कामांवर विपरित परिणाम होत असल्याची तक्रार पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र त्याची दखल ना आयुक्तांनी घेतली आणि ना सरकारने घेतली. त्यामुळे अद्यापही घरोघरी मराठा सर्व्हेक्षण काम जोमात सुरू आहे.

मात्र मागास वर्ग आयोगाने दिलेल्या ॲपनुसार कर्मचारी घरोघरी जावून काही प्रश्न विचारून माहिती गोळा करीत आहेत. मात्र याच सर्वेक्षणाच्या अंतर्गत एका महिला कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने अभिनेता पुष्कर जोग यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. त्याचे तीव्र पडसाद कर्मचारी संघटनांमध्ये उमटले आहेत. महिला कर्मचाऱ्यांप्रती अपमानस्पद विधान केल्याने कामगार संघटनांनी सिने कलाकार पुष्कर जोग यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन व दि म्युनिसिपल युनियन या संघटनांनी तीव्र निषेध करीत जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोग व पालिका आयुक्त यांच्याकडे केली असल्याची माहिती युनियनचे नेते साईनाथ राजाध्यक्ष आणि रमाकांत बने यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -