घरमुंबईहरिग्राम येथे नैनाची कारवाई

हरिग्राम येथे नैनाची कारवाई

Subscribe

पनवेलमधील स्वप्नपूर्ती होम्स या कंपनीच्या अखत्यारित सुरू असलेल्या प्रकल्पाला नैनाच्या नियमांमुळे कात्री बसल्याने प्रकल्पाचे काम बंद पडले. मात्र, चार वर्षांच्या कालावधीत येथील ग्राहकांनीच उभ्या स्ट्रक्चरलवर आपापली घरे बांधून राहण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी नैनाच्या माध्यमातून सोमवारी धडक कारवाई करण्यात आली आहे. येथील रहिवाशांना नैनाकडून नोटिसादेखील देण्यात आल्या आहेत. उर्वरित स्ट्रक्चरल भाग नैनाने सोमवारी पोकलँडच्या साहाय्याने तोडला आहे.

तालुक्यातील हरिग्राम येथील सर्व्हे नं. १३, २ ए, २ बी, २ सी येथे स्वप्नपूर्ती होम्स या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांची आणि कंपनीची गुंतवणूक घेऊन स्वप्नपूर्ती होम्सचा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. मात्र, सन २०१४ साली नैना प्रकल्पामुळे सिडकोने सदर बांधकाम अवैध ठरवत थांबवले गेले. यावेळी सिडकोकडे रितसर परवानगीसाठी प्रकल्प प्रोजेक्ट सादर केला होता. मात्र, सिडकोने तोदेखील फेटाळला होता. काम थांबल्यामुळे ग्राहकांचीही चुळबुळ सुरू होऊन त्यांनीही कंपनीच्या विरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली. मात्र, सदर प्रकरणात कंपनी व्यवस्थापन म्हणून व्यावसायिक शरद अमृत मोझर यांनी वृत्तपत्रात जाहीर नोटीस काढून दीड वर्षांमध्ये सर्वांना घरे देण्याचे कबूल केले होते.

- Advertisement -

मात्र, यावेळी संबंधित ८० टक्के ग्राहकांनी जागा आमच्या नावावर करा, असा आग्रह धरल्याने त्या ग्राहकांना व्यावसायिकांनी जागाही उपलब्ध करून दिल्या. मात्र, ज्या ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या त्या तक्रारींमुळे व्यावसायिक शरद मोझर यांच्यावर ग्राहक मंच आणि गुन्हे न्यायालयात गुन्हे दाखल झाले. यामध्ये शरद मोझर यांना अटकही झाली. यावेळी त्यांचे व्यावसायिक भागीदार यांनी मात्र या प्रकारातून पळ काढत पनवेल सोडले. सदर प्रकरणात व्यावसायिक अटक झाल्यानंतर ग्राहकांनी मोकळ्या असलेल्या स्वप्नपूर्ती होम्सच्या जागेत स्वतःहून बांधकाम करून बिगर ताबा राहण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी अखेर नैनाने येथील पिलर उभे केलेल्या इमारती तोडून कारवाई केली, तसेच येथील रहिवासी असलेल्यांना नोटीस बजावून त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -