घरमुंबईनायर हॉस्पिटल तरुणाचा मृत्यू प्रकरण; हॉस्पिटलविरोधात याचिका दाखल

नायर हॉस्पिटल तरुणाचा मृत्यू प्रकरण; हॉस्पिटलविरोधात याचिका दाखल

Subscribe

नायर रुग्णालयामध्ये एमआरआय मशिनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी याचिका दाखल केली आहे.

नायर रुग्णालयामध्ये एमआरआय मशिनमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू झालेल्या राकेश मारु या तरुणाच्या कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली आहे. नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राजेश मारुचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने देखील नायर रुग्णालय, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला एका आठवड्यात भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

अशी घडली होती घटना

२७ जानेवारी २०१८ ला नायर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी राजेश गेले होता. पेशंटची एमआरआय चाचणी करायची होती. त्यासाठी राजेश पेशंटला घेऊन एमआरआय कक्षामध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी पेशंटच्या गळ्यातील दागिणे काढून ठेवण्यास सांगितले. ते झाल्यानंतर नायर रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने राजेशला ऑक्सिजन सिलेंडर एमआरआय कक्षामध्ये घेऊन जायला सांगितले. एमआरआय कक्षामध्ये कुठल्याच धातूच्या वस्तू घेऊन जाण्यास बंदी असते. एमआरआय मशीन बंद आहे त्यामुळे तुम्ही सिलेंडर घेऊन आत जाऊ शकता असे या वार्डबॉयने सांगितल्याने राजेश सिलेंडर आत घेऊन गेला. पण आतमध्ये एमआरआय मशीन चालू असल्यामुळे चुंबकिय शक्तीमुळे राजेश मशीनमध्ये खेचला गेला. ऑक्सिजन सिलेंडर आणि मशिनमध्ये अडकून राजेशचा दुर्देवी मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकणात कारवाई करण्यात येत नाही

याप्रकरणी राजेशच्या मेहुण्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर मुख्यमंत्री निधीतून ५ लाखांची मदत राकेशच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. याप्रकरणामध्ये चौकशी समितीने तयार केलेला अहवाल माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न राकेशच्या कुटुंबियांनी केला मात्र त्यासाठी वारंवार रुग्णालयाकडून टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणात पुढे काहीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे राकेशच्या कुटुंबियांनी थेट हायकोर्टात धाव घेतली.

नुकसान भरपाई द्यावी

राकेशची बहिण आणि आई -वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राकेशचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राकेश घरातला कर्ता आणि कमावता व्यक्ती होता. त्याच्या जाण्यामुळे घर चालवणे कठिण झाले आहे. त्याचसोबत राकेशच्या जाण्यामुळे कुटुंबाला मोठा मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी असे न्यायालयाने रुग्णालयाला सांगावे अशी विनंती राकेशच्या कुटुंबियानी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -