घरमुंबईयंदा १५ ऑगस्टला बियांचा झेंडा!

यंदा १५ ऑगस्टला बियांचा झेंडा!

Subscribe

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी बियांच्या कागदापासून बनवलेले झेंडे विद्यार्थ्यांना देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

भारताचा तिरंगा हा आपल्या देशाची शान असण्याबरोबरच देशातील कोट्यवधी जनतेच्या आकांक्षा आणि विश्वासाचेही प्रतीक आहे. मात्र, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी या तिरंग्याची काय अवस्था असते? रस्त्यावर, भिंतींवर, कठड्यांवर हे विविध प्रकारचे ध्वज पडलेले असतात. तिरंग्याचा हा अपमान रोखण्यासाठी कल्याणमधील ‘द केम्ब्रिआ इंटरनॅशनल’ शाळेने पुढाकार घेतला असून ‘प्लँट द नेशन’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य किंवा प्रजसत्ताक दिनी झेंडावंदन झाल्यानंतर आपला हा तिरंगा रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात, घाणीमध्ये पडलेला दिसतो. यातील बहुतांश ध्वज हे प्लॅस्टिकचे बनवण्यात आलेले असल्याने परिणामी त्यातून प्रदूषणामध्ये वाढ होण्यास आणखीनच हातभार लागतो. या प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो किंबहुना हजारो वर्ष लागतात आणि त्यातून आपल्या देशाच्या अस्मितेचा अपमान करण्याबरोबरच नकळतपणे आपण निसर्गाचीही अपरिमित हानी करतो. तिरंग्याचा हा अपमान आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी यंदाच्या वर्षीपासून द केम्ब्रिआ इंटरनॅशनल स्कूल ‘प्लँट द नेशन’ हा उपक्रम राबवत आहे.

बियांच्या कागदापासून बनवले झेंडे!

या शाळेने झाडांच्या बियांच्या कागदापासून झेंडे बनवले असून त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे. या झेंड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य दिन किंवा प्रजसत्ताक दिनाचा सोहळा झाल्यानंतर त्यांचे आपण मातीमध्ये रोपणही करू शकतो. ज्यातून तिरंग्याचा अवमानही थांबेल आणि पर्यवरण रक्षणाचेही काम होईल. तर या पर्यावरणपूरक उपक्रमात अधिकाधिक लोकानी सहभागी होण्याचे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले असून त्यासाठी अवघे १० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळेकडून ८६५५६५५३०४ हा मोबाईल क्रमांक देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाला मुंबईत बंदी

तिरंग्याचं पावित्र्य जपलं जाणं आवश्यक

स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिन. आपल्या शाळा, सोसायटी किंवा कार्यालय परिसरात तिरंगा ध्वज फडकवताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. या तिरंग्याचे पावित्र्य जपले जावे आणि वेगाने पसरणारे प्रदूषण थांबावे याच उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी दिली. तसेच अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -