घरमुंबईपक्ष्यांचा मुक्त संचार अनुभवायचा आहे? मुंबईच्या लगत निर्माण झालंय 'बर्ड पार्क'

पक्ष्यांचा मुक्त संचार अनुभवायचा आहे? मुंबईच्या लगत निर्माण झालंय ‘बर्ड पार्क’

Subscribe

पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटायचा असल्यास आता लांब कुठेतरी जंगलात जाण्याची गरज नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आता एका बर्ड पार्कची स्थापना झाली आहे.

तूम्ही पक्षी प्रेमी आहात? पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहण्यासाठी लांब जंगलात जावं लागतं. मात्र आता पक्ष्यांना पाहण्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. देश-विदेशातील पक्षी पाहण्याची मुबंईतच सोय झाली आहे. मुंबईत ‘एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क’ला आजपासून सुरुवात केली आहे. पक्ष्यांचा मुक्त संचार अनुभवण्यासाठी तुम्ही येथे भेट देऊ शकता. एस्सेलवर्ल्ड लीझर प्रा. लि. या ६ बिलियन डॉलरच्या एस्सेल ग्रुपच्या कौटुंबिक मनोरंजन विभागाने आज मुंबईत ‘एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क’चा शुभारंभ केला. पक्षी अभयारण्यात एक्झॉटिक आणि अनुभवात्मक फेरीचा अनुभव देणारा हा भारतातील पहिला उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पार्क पर्जन्यवनाच्या संकल्पनेनुसार १.४ एकरांच्या विस्तृत प्रदेशात पसरले आहे. या संपूर्ण पार्कमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवांचा समावेश आहे. जगभरातील ६० हून अधिक विविध प्रकारच्या प्रजातींमधील उडू शकणारे, जमिनीवरील आणि पाण्यातील असे ५०० हून अधिक विदेशी पक्षी इथे पाहता येतील.

मुंबईच्या लगत निर्माण झालंय ‘बर्ड पार्क’

मुंबईच्या लगत निर्माण झालंय ‘बर्ड पार्क’

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 11, 2019

- Advertisement -

एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमध्ये २०० प्रजातींची खास झाडेझुडपेही आहेत. त्यामुळे, पक्ष्‍यांसाठी हे एक उत्तम निवासस्थान ठरतेच. शिवाय, निसर्गाचा आनंद घेण्याचीही ही एक सुयोग्य जागा ठरते. या पक्षांची काळजी घेण्यासाठी आणि सुयोग्यरित्या, प्रमाणबद्ध वातावरणाचा विचार करत उभारण्यात आलेल्या पक्षांच्या या निवासस्थानाची नैसर्गिक व पर्यावरणस्नेही पद्धतीने काळजी घेण्यासाठी पक्ष्‍यांच्या संवर्धनाचा दूरगामी विचार करत एस्सेलवर्ल्डने तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. या पार्कमध्ये पक्ष्‍यांसाठी खास स्वयंपाकघर आणि आरोग्यकेंद्रही आहे.

एस्सेलवर्ल्ड लीझर प्रा. लि.चे प्रवर्तक श्री. अशोक गोयल म्हणाले, “पक्षी म्हणजे निसर्गाची सर्वात सुंदर आणि रंगबिरंगी निर्मिती. त्यामुळेच त्यांचे संरक्षण व संवर्धन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कच्या सादरीकरणातून अभ्यागतांचे मनोरंजन करण्याचा आमचा उद्देश आहेच. त्याचबरोबर आपल्या पृथ्वीला राहण्याची एक सुंदर जागा बनवणाऱ्या या पक्षांबद्दल जनजागृतीही आम्ही करत आहोत. पक्ष्यांचे हित जपण्यासाठी, त्यांना योग्य प्रकारे हाताळले जाईल आणि त्यांचे संवर्धन होईल यासाठी आम्ही अत्यंत काळजीपूर्वक सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.”

- Advertisement -

या बर्ड पार्कमध्ये अनेक आकर्षणे आहेत. आफ्रिकन ग्रे पॅरट, ब्ल्यू गोल्ड मकाव, कॉकाटेल, रेनबो लोरिकीट, टौकान, ब्लॅक लोरी आणि वॉयलेट टुराको यांसारखे उडणारे पक्षी, कॅलिफोर्निया क्वेल, गोल्डन फीजंट आणि ऑस्ट्रिच (शहामृग) यासारखे जमिनीवरील पक्षी तसेच ब्लॅक स्वान, अमेरिकन वूड डक आणि मँडरिन डक यांसारखे पाणपक्षी अशा अनेक प्रजाती इथे पाहता येतील.

एस्सेलवर्ल्ड लीझर प्रा. लि.चे सीईओ श्री. शिरीष देशपांडे म्हणाले, “एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्क हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमची टीम गेली काही वर्षे अथक मेहनत करत आहे. कौटुंबिक मनोरंजन क्षेत्रात अग्रणी असलेल्या एस्सेलवर्ल्डने मनोरंजनाच्या व्याख्या नेहमीच नव्याने मांडल्या आहेत. बर्ड पार्कच्या शुभारंभातून आमच्या पाहुण्यांना आम्ही काहीतरी वेगळे देऊ इच्छितो आणि इथल्या प्रत्येक भेटीत त्यांना संस्मरणीय अनुभव मिळेल, याची खात्री करू इच्छितो.”

या बर्ड पार्कला भेट देण्यातील सर्वात रंजक बाब म्हणजे तुम्ही या विदेशी पक्ष्यांना जवळून पाहू शकता, तुमच्या हाताने त्यांना खाणे देऊ शकता आणि त्यांच्यासोबत फोटोही काढू शकता. इथे फिडिंग डेक, रेनफॉरेस्ट वॉक, रेनबो वॉक, विविध वस्तू विकत घेता येतील असे शॉपिंग नेस्ट व वुडपेकर्स स्टेडिअम नावाचे अॅम्फिथिएटरही आहे. इथे पक्ष्यांसोबत संवाद साधता येतो. या पार्कमध्ये भारतातील पहिल्या वॉक-इन एविअरचा समावेश आहे. या फेरीत तुम्हाला विदेशी पक्ष्यांचा मुक्त संचार अनुभवता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -