घरमुंबईराष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा

Subscribe

२ नोव्हेंबरला खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर मुनावर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत रिक्षाचालकाला पटेल यांच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी रिक्षाचालकाला जबर मारहाण करण्यात आली असे रिक्षाचालकाने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर पटेल यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर पटेल यांच्याविरोधात एका रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली होती. मुनावर पटेल हे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. मुनावर यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे. दरम्यान हे राजकीय षडयंत्र असून लोकप्रियता वाढत असल्याने हे कारस्थान रचण्यात आले, असल्याचा दावा मुनावर पटेल यांनी केला आहे.

अशी घडली घटना

२ नोव्हेंबरला खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर मुनावर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत रिक्षाचालकाला पटेल यांच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी रिक्षाचालकाला जबर मारहाण करण्यात आली असे रिक्षाचालकाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी रिक्षा चालकाने थेट कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेत मुनावर पटेल यांच्याविरोधात अपहरण आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.

- Advertisement -

अखेर गुन्हा दाखल

रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन कोपरखैरणे पोलिसांनी मुनावर पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे रिक्षा चालकाने थेट नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कोपरखैरणे पोलिसांनी शेवटी मुनावर पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र कोपरखैरणे पोलिसांनी त्यांच्यावर रिक्षा चालकाने केलेले आरोप फेटाळले आहे. दरम्यान नगरसेवक मुनावर पटेल यांनी माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. चांगल्या कामाने मिळणारी लोकप्रियतेमुळे हे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -