घरदेश-विदेशNEET PG Exam 2022 : केंद्राने NEET PG परीक्षा 8 आठवड्यांपर्यंत ढकलली...

NEET PG Exam 2022 : केंद्राने NEET PG परीक्षा 8 आठवड्यांपर्यंत ढकलली पुढे, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

Subscribe

NEET PG परीक्षेबाबत दाखल केलेल्या एका याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

अनेक दिवसांपासून देशात चर्चेत असलेल्या NEET PG परीक्षांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG Exam ही 6 ते 8 आठवड्यांपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. NEET PG 2021 परीक्षांच्या समुपदेशनामुळे यंदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले आहे. NEET PG 2022 ची ही परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती. पण आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, नीट पीजी समुपदेशनाच्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2021 च्या तारखा या वर्षीच्या परीक्षेच्या तारखेदरम्यानचं आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आगामी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

- Advertisement -

 


विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरत या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती, त्यावर कोर्टानेही विचार करण्यास मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त मानून आरोग्य मंत्रालयाने आता परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

NEET PG परीक्षेबाबत दाखल केलेल्या एका याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेत विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. यात याचिकाकर्त्यांनी मेडिकल इंटर्नशिपचा हवाला दिला होता. तसेच दोन बॅचला एकाच वेळी सर्व जागा कशा देता येतील. त्यामुळे 12 मार्च रोजी परीक्षा घेणे योग्य नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी असं मत मांडले होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -