घरमुंबईअग्निशमन दलाच्या ताफ्यात नवीन फ्लड रेस्क्यू उपकरणे

अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवीन फ्लड रेस्क्यू उपकरणे

Subscribe

अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यासाठी आता बोटींसह फ्लड रेस्क्यू उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. जुन्या सहा बोटींसह ही फ्लड रेस्क्यू उपकरणे कालबाह्य ठरल्याने आता त्या जागी नव्याने उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी ही उपकरणे अग्निशमन दलासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

जुलै 2005 मधील महाप्रलयंकारी पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली होती. पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीवर उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाने 2006 मध्ये फ्लड रेस्क्यू उपकरणे खरेदी केली होती. परंतु, सततच्या वापरामुळे उपकरणांचा आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रमाणात वापर करताना अडचणी येत आहेत. फ्लड रेस्क्यू उपकरणे ही दहा वर्षांकरिता असल्याने त्यांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे या उपकरणांच्या जागी नव्याने उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत.

- Advertisement -

सुमारे ८८ लाख रुपये खर्च करून या बोटींसह उपकरणांची खरेदी केली जात आहे. श्री ललिता या कंपनीकडून बोटींसह रेस्क्यू उपकरणांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत या बोटी तसेच रेस्क्यू उपकरणे दाखल होतील, असा विश्वास अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

खरेदी करण्यात येणारी फ्लड रेस्क्यू उपकरणे
* २५ एचपी ओ.बी.एमसह प्लास्टिक रेस्क्यू बोट्स : ०६
* रेस्क्यू बोर्ड : ०६
* पर्सनल फ्लोटींग डिवाईस : ३६
* रेस्क्यू ट्युब : ३०
* रिचार्जेबल वॉटर प्रूफ टॉर्च : १६
* रिजिड कयाक : ०६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -