घरक्राइमबोईसरमध्ये एनआयएचा छापा; तीन संशयित तरुणांची चौकशी

बोईसरमध्ये एनआयएचा छापा; तीन संशयित तरुणांची चौकशी

Subscribe

छापा टाकलेले संशयित बोईसरमधील अवध नगर आणि आझाद नगर भागात राहतात.

वसई विरार : आयसिस आणि अल कायदा यादहशतवादी संघटनेशी संबंधित बोईसरमधील हमराज शेख (24) या तरुणाच्या अटकेनंतर आता एनआयएने पुन्हा एकदा बोईसर परिसरातील अवध नगर आणि आझाद नगर परिसरात छापा मारून तीन संशयितांची चौकशी केली. या तीनही तरुणांना पुढील चौकशीसाठी एनआयएच्या बेंगळुरू कार्यालयात हजर राहण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.(NIA raid in Boisar; Interrogation of three suspected youths)

आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भारतीय तरुणांना दहशतवादी आणि हिंसाचारात सहभागी करून घेण्याच्या प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात बोईसरमधून हमराज शेख (24) याच्यासह बंगळुरू येथून एका तरुणाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बोईसर येथील आणखी तीन संशयितांच्या घरांवर 31 ऑगस्टला पहाटे छापे टाकले. छापा टाकलेले संशयित बोईसरमधील अवध नगर आणि आझाद नगर भागात राहतात. एनआयएने त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. त्यांना एनआयए बंगळुरू कार्यालयात पुढील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : BEST Bus : मालवणी डेपोमध्ये इलेक्ट्रिक बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

याआधी फेब्रुवारीमध्येही टाकला होता छापा

यावर्षी 11 फेब्रुवारी रोजी एनआयएने पालघरच्या बोईसरमधून हमराज वोर्शिद शेख (24) आणि बंगळुरू येथील थानीसांद्रा येथून मोहम्मद आरिफ यांना अटक केली होती. तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी अल कायदाच्या कारवायांशी संबंधित प्रकरणात अफगाणिस्तानला जाण्याची व्यवस्था केली होती. मोहम्मद आरिफ आणि हमराज शेख बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित परदेशी हस्तकांच्या ऑनलाइन संपर्कात होते, असे तपासात उजेडात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा : मोदी द्वेषाने पछाडलेली ही विरोधकांची टोळी; मुख्यमंत्री शिंदेचा घणाघात

हमराजच्या कुटुंबियांचा पादत्राणे विक्रीचा व्यवसाय

हमराजच्या कुटुंबियांचे पादत्राणे विक्रीचे दुकान आहे. हमराजने बोईसर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डहाणू कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -