घरमुंबई'जंकफुड टाळा, आरोग्य सांभाळा' शाळा

‘जंकफुड टाळा, आरोग्य सांभाळा’ शाळा

Subscribe

एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी शाळामध्ये आहाराबाबत विशेष कार्यशाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थी घरातून निघण्यासापासून शाळेत जाण्याच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी जंकफूडचा वावर दिसून येतो. या जंकफूडचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे,  मुलांना जंकफूडपासून परावृत्त करण्यासाठी घरातील पालक, शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच कॅन्टीन चालक या सर्वांना एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी शाळामध्ये आहाराबाबत विशेष कार्यशाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर प्रत्येकाने पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.  तसंच, ‘जंकफुड टाळूया, आपले आरोग्य सांभाळुया’ असा संदेश ही देण्यात आला आहे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सकस आहाराबाबत कार्यशाळा

विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि सकस अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून गुरुवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरक्षित, पौष्टिक आणि सकस अन्नपदार्थांचा मेनूमध्ये समावेश केलेला आहे. अशा शाळा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

- Advertisement -

शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक अभ्यासक्रमासह चांगल्या अन्नपदार्थांची सवय आणि शारिरीक स्वास्थ्याची देखभाल आणि शिस्तबद्ध जीवनशैली याचे महत्त्व आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय यांचे प्राचार्य, कॅन्टीनचालक आणि पालक यांनी सुरक्षित आणि स्वस्थ आहारासाठी एकत्रित काम करणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय यांना सुरक्षित पौष्टिक आणि सकस अन्नपदार्थ मेनूमध्ये समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  पल्लवी दराडे; अन्न व औषध प्रशासन आयुक्त 

अन्न आणि औषध प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोषक, पौष्टिक, सुरक्षित अन्न आणि स्वच्छतेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे आतापर्यंत ३० हजार शाळा आणि महाविद्यालय यांना पोहचवण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नगरमध्ये ८०० शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनला एफडीएचे पत्र; जंक फूडला मनाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -