घरमुंबईमुंबईत उत्तर मुंबई अव्वल, बोरीवलीने मारली बाजी

मुंबईत उत्तर मुंबई अव्वल, बोरीवलीने मारली बाजी

Subscribe

बच्चे कंपनीचा हिरमोड

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाने संपूर्ण मुंबईत मतदानात बाजी मारली. मुंबईतील सर्वात चर्चेत असलेल्या या मतदारसंघात यंदा सर्वाधिक ६० टक्के मतदान झाले असून मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये अग्रक्रम मिळवला आहे. एवढेच नाहीतर या सहाही लोकसभा मतदारसंघांमधील विधानसभा क्षेत्रातील मतदानात अव्वल क्रमांक उत्तर मुंबईतील बोरीवलीने राखला आहे. बोरीवली विधानसभा क्षेत्रात एकूण ६६.१९ टक्के मतदान झाले असून मुंबईतील सर्व विधानसभांच्या तुलनेत बोरीवलीतील मतदानाचा हा वाढता टक्का लक्षणीय ठरला आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी निवडणूक रिंगणात आहेत. मातोंडकर यांनी निवडणुकीत उतरल्यापासून हा मतदार संघ चर्चेत आहे. विद्यमान भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा मतदार संघ सर्वात सोप्पा पेपर असल्याचे सांगितले. गोपाळ शेट्टी यांनी आपला विजय सहज असल्याने निवडणुकीत जास्त होमवर्क न करता आपण जिंकू असा निर्धार केला होता. परंतु प्रचारात मातोंडकर यांनी बाजी मारली आणि शेट्टी यांच्या तोंडाला फेस आणला. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यात कोण यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष होते.

- Advertisement -

सोमवारी झालेल्या मतदानावर जर आपण नजर टाकली तर भाजपचे बालेेकिल्ले असलेल्या बोरीवली आणि कांदिवली पश्चिम अर्थात चारकोप विधानसभा मतदार संघात अनुक्रमे ६६.१९ टक्के व ६०.८० टक्के एवढे झालेले मतदान हे शेट्टींच्या पथ्यावर पडणार आहे. तर मातोंडकर यांच्यासाठी धोक्याचे आहे. विशेष म्हणजे मालाड पश्चिम हा काँग्रेसचा गड मानला जातो. काँग्रेसचा आमदार असल्याने येथील मते काँग्रेसची मानली जातात. परंतु मालाड पश्चिम मतदार संघात ५६.९२ टक्के एवढे मतदान झाले आहे. येथील मतदानाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी त्या तुलनेत येथे चांगले मतदान झाले आहे. मागाठाणे मतदार संघात शिवसेना आणि मनसेचेही प्राबल्य आहे. येथील वाढलेला मतदानाचा टक्का दोन्ही उमेदवारांच्या फायद्याचा आहे. तर दहिसर हा भाजपचा गड राहिलेला नाही. त्यात गणपत पाटील नगरसह आयसी कॉलनी मध्ये ख्रिश्चन लोकांनी केलेले मतदान हे मातोंडकर यांच्या पारड्यात पडणारे आहे. तर कांदिवली पूर्व येथील मतदान भाजपच्या बाजुने अधिक असल्याने शेट्टी यांच्या दिशेने विजयाची किरणे पडताना दिसत आहे.

आजवर मतदानाचा वाढती टक्केवारी ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मानली जाते. त्यामुळे या मतदार संघातील वाढलेले हे मतदान भाजप व शिवसेना महायुती विरोधात असा त्याचा अर्थ काढला जावू शकत नाही. त्यामुळेे यंदाच्या निवडणुकीतील मतदानाची वाढती आकडेवारी ही अंदाज चुकवणारी असेल की जाणकारांच्या जुन्या अंदाजाप्रमाणेच असेल हे २३ मे रोजी मतपेटी उघडल्यानंतर स्पष्ट होईल. मनसेचे उर्मिलाला होणारे मतदान, शिवसेनेची फुटली जाणारी मते आणि आपल्यावरच नाराज झालेली मते मातोंडकर यांच्या पारड्यात पडल्यास भाजपसाठी हा विजय तेवढा सोपा मानला जात नाही याची खात्री शेट्टींना आहे. त्यामुळे मतांची वाढती टक्केवारी शेट्टींना सुखावणारी आहे, तेवढीच धोकादायक ठरणारीही आहे.

- Advertisement -

मतदार संघ आणि झालेले मतदान (टक्के)
बोरीवली – ६६.१९
दहिसर – ६२.३९
मागाठाणे – ५७.७१
कांदिवली – ५५.७१
चारकोप – ६०.८०
मालाड पश्चिम – ५६.९२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -