घरमुंबईठाणे जिल्ह्यातील शहरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

ठाणे जिल्ह्यातील शहरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

Subscribe

मुंबईलगत असणार्‍या ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या उपलब्ध असणारे जलस्त्रोत अत्यंत अपुरे असून, त्यामुळे येथील नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. मात्र, दुर्दैवाने ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेली काळू, शाई धरणांना स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरणीय नियमांच्या अडचणींमुळे मार्गी लागू शकली नाहीत. त्यामुळे एकूण उपलब्ध पाणीसाठा आणि शहरांची गरज यात तूट येत असून, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गळती, पाणीचोरी, जलप्रदूषण आदीही समस्या टंचाईला कारण आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण आणि भिवपुरी येथील टाटा जलविद्युत प्रकल्पामुळे बारमाही झालेल्या उल्हास नदीतून पाणीपुरवठा होतो. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिबली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना प्रतिदिन 1240 दशलक्ष लिटर्स पाणी उचलण्यास मंजुरी आहे. प्रत्यक्षात वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून संबंधित प्राधिकरणे दररोज 1540 दशलक्ष लिटर्स पाणी उचलत होते. यंदा सरत्या पावसाने आडखता हात घेतल्याने मुळातच पाणीसाठा कमी आहे. अशा परिस्थितीत दररोज 1540 दशलक्ष लिटर्स पाणी उचलले असते, तर मार्च महिन्यातच जलसाठा संपला असता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने डिसेंबर महिन्यापासूनच आठवड्यातील तीस दिवस पाणीकपात लागूू केली. त्यामुळे सध्या 1357 दशलक्ष लिटर्स पाणी दररोज उचलले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली. मात्र, शहरांची लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची मागणी आणि पुरवठा यांचे गणित जुळवणे दिवसेंदिवस अवघड होणार आहे. त्यामुळे तातडीने पर्यायी जलस्त्रोत उपलब्ध करावे लागणार आहेत.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई आणि अंबरनाथ या दोन शहरांच्या मालकीची धरणे आहेत. नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. शिवाय बारवी धरणातूनही नवी मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा होतो. अंबरनाथ पालिकेचे चिखलोली धरण आहे. त्यातून पूर्व विभागात सहा दक्षलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो.

आधीच पाणी अपुरे त्यात प्रदूषण आणि गळती
आधीच उल्हास नदीतून होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यात वाढत्या प्रदूषणामुळे तो पाणीपुरवठाही धोक्यात आला आहे. बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पात्रात घरगुती तसेच औद्योगिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते. नदीकिनारी असलेली शेतघरे आणि रिसॉर्ट नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने नदीचे संवर्धन करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, बाबतीत शासकीय पातळीवर उदासीनता आहे. अंबरनाथमधील चिखलोली धरणाचीही तशीच अवस्था आहे. शेजारील कंपन्या त्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता धरणात सोडतात. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. याच कारणाने गेल्या मे महिन्यात या धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. शहरातील टँकरमाफियाही मोठ्या प्रमाणात येथून बेकायदेशीरपणे पाणी उचलतात. पाणी वितरण व्यवस्था अतिशय सदोष आहे. जुन्या वाहिन्यांमधून पाणी गळते. काही ठिकाणी नव्या वाहिन्या टाकूनही जुन्यातूनही पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरमाफिया अथवा बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात पाणी चोरतात. गळतीचे प्रमाण तब्बल 30 ते 35 टक्के आहे, ते 20 टक्क्यांपर्यंत आले तरी पाण्याची फार मोठी बचत होऊ शकणार आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी सध्या दररोज 1540 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एवढ्या मात्रेने पाणी उचलल्यास मार्च महिन्यातच पाणी संपून जाईल. त्यामुळे यंदा डिसेंबर महिन्यापासून आठवड्यातून तीस तास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रतिदिन पाणीवापर 1357 दशलक्ष लिटर्स इतका आहे. प्रत्यक्षात ठाण्यातील शहरांचा मंजूर कोटा 1240 दशलक्ष लिटर्स इतकाच आहे. म्हणजे दररोजच्या पाणी पुरवठ्यात आता 300 दशलक्ष लिटर्सची तूट आहे. लोकसंख्या वाढतच असल्याने ही तूट वाढत जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -