घरमुंबईकल्याणात जुन्या इमारतीचा भाग कोसळला

कल्याणात जुन्या इमारतीचा भाग कोसळला

Subscribe

कल्याण पश्चिमेतील दुध नाक्यावरील फगारी हाऊस ही दुमजली इमारतीचा भाग दुपारी तीनच्या सुमारास कोसळला. १९४४ साली ही इमारत बांधण्यात आली होती. कोसळलेला काही भाग रस्त्यावर असलेल्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले.

कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील ७५ वर्ष जुनी इमारतीचा भाग कोसळल्याची आणि बिर्ला स्कूल परिसरात एका इमारतीची धोकादायक भिंत कोसळल्याच्या दोन वेगवेगळया घटना गुरूवारी कल्याणात घडल्या आहेत. मात्र या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र इमारतीचा भाग रिक्षावर कोसळल्याने कल्याणातील धोकादायक इमारतीचा प्रश्न पून्हा एकदा चर्चेत आला आहे.

अग्निशमन दल व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव

कल्याण पश्चिमेतील दुध नाक्यावरील फगारी हाऊस ही दुमजली इमारतीचा भाग दुपारी तीनच्या सुमारास कोसळला. १९४४ साली ही इमारत बांधण्यात आली होती. कोसळलेला काही भाग रस्त्यावर असलेल्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. या इमारतीत कोणीही राहत नव्हते, ही इमारत पाडण्यात आली असून शेजारील इमारतीतील रहिवाशांना खाली करण्यात आले असून पालिकेने ही इमारत तोडण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी दिली. तसेच कल्याण पश्चिमेतील बिर्ला स्कूल परिसरातील श्री बिल्डींग इमारतीची संरक्षण भिंत शेजारील नवनाथ नगरमधील चाळीवर पडल्याची घटना संध्याकाळी घडली. अग्निशमन दल व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याणमध्ये लोकलच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -