घरमुंबई२६ जानेवारीनिमित्त एक रुपयात चहा, मस्कापाव

२६ जानेवारीनिमित्त एक रुपयात चहा, मस्कापाव

Subscribe

व्यवसायातून कमावतात १२ ते १३ हजार रुपये

समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून हिंजवडी येथील वाकळे अमृतुल्यने प्रजासत्ताक दिनानिमित्त चक्क १ रुपयात चहा आणि मस्कापाव ग्राहकांना दिला होता. याचा गोडवा हिंजवडीमधील असंख्य संगणक अभियंत्यांनी घेतला आहे. पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या त्यांचा या उपक्रमामध्ये तब्बल ३ हजार ७०० जणांनी चहाचा आस्वाद घेतला आहे. २४ वर्षीय निलेश गजानन वाकळे यांनी हात गाडीपासून व्यवसायाची सुरुवात केली होती. आज मात्र त्यांचा चहाचा व्यवसाय जोरात चालत आहे. त्यामुळे चहाच्या व्यवसायातून दररोज १२ ते १३ हजार रुपये कमवणार्‍या निलेश यांनी  तरुणांना व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्त नागरिक कोणते ना कोणते उपक्रम राबवत असतात. याच भावनेतून वाकळे यांनी आपण १ रुपयात चहा आणि मस्कापाव द्यायचा असे ठरवले. ते त्यांनी सत्यात उतरवले आणि शनिवारी पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत शेवटचा ग्राहक येईपर्यंत उपक्रम सुरू ठेवला होता. यात मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंते, स्थानिक नागरिक असल्याचे निलेश सांगतात. एक रुपयांना चहा असल्याने शनिवारी तब्बल ३ हजार ७०० कप चहाचा खप झाला आहे. वाकळे अमृतुल्य हे हिंजवडी येथे असल्याने मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंते याच आस्वाद घेताना दिसत आहेत.
निलेश यांचे शाळेत मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी व्यवसायात स्वतः झोकून दिले. त्यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाले असून, आज ते यशस्वी व्यवसायिकाकडे वाटचाल करत आहेत. ते दररोज १२ ते १३ हजार रुपये या व्यवसायातून कमावत आहेत. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या भरोशावर न राहता स्वतःचा व्यवसाय करावा, असे ते म्हणतात. निलेश यांना वडील आणि मोठा भाऊ व्यवसायात हातभार लावत आहे. काही वर्षांपूर्वी निलेश हे हिंजवडी येथील आयटीपार्कमध्ये हातगाडीवर व्यवसाय करत होते.चहा पोहे हे त्यावेळी खूप चालायचे. मात्र, त्यांनी आयटीपार्कमध्ये मोठा व्यवसाय करायचा चंग बांधला होता. तो त्यांनी काही प्रमाणात सत्यात उतरवला आहे. निलेश यांनी अनेक व्यवसाय केले त्यात अपयश आले. मात्र, त्या अपयशाला खचून न जाता निलेश यांनी प्रयत्न सुरू ठेवले. आज ते चांगले व्यावसायिक असून, त्यांची दोन चहाची हॉटेल आहेत. त्यामुळे कुठलाच व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -