घरमुंबईदुर्दैवी घटना: चिंचपोकळी येथे इमारतीच्या गच्चीवरून पडून चिमुरडीचा मृत्यू

दुर्दैवी घटना: चिंचपोकळी येथे इमारतीच्या गच्चीवरून पडून चिमुरडीचा मृत्यू

Subscribe

दीड वर्षाच्या चिमुरडीचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी चिंचपोकळीच्या डॉक्टर कंपाऊंड येथील प्रोग्रेसिव्ह इमारत येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळव्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आरोही रमेश राणे असे या चिमुरडीचा नाव आहे. चिंचपोकळी येथील डॉक्टर कंपाऊंड येथील प्रोग्रेसिव्ह बी विंग या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे रमेश राणे हे पत्नी आई, लहान भाऊ आणि दोन मुलीसह राहतात.

इमारतीजवळच वडापाव गाडी लावणारे रमेश यांची दीड वर्षाची मुलगी आरोही ही मंगळवारी दुपारी १ वाजण्याचा सुमारास अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी तसेच शेजाऱ्यांनी आरोहीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडत नसल्यामुळे अखेर काळाचौकी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. काळाचौकी पोलिसांनी आरोहीचा शोध सुरु केला, दरम्यान स्थानिकांनी आरोहीच्या शोधासाठी तिचे छायाचित्र आणि तिच्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आली.

- Advertisement -

हे वाचा – लग्नापूर्वीच वधुकडे शरीर सुखाची मागणी, वधुने शिकवला चांगलाच धडा

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता आरोही इमारतीच्या बाहेरच पडलेली नसल्याचे दिसून आले. अखेर पोलिसांनी इमारतीत असणाऱ्या खोल्या तपासण्यास सुरुवात केली, दरम्यान चौथ्या मजल्यावर राहणारे बागवे यांची बंद खोली शेजाऱ्यांकडून चावी घेऊन तपासली, त्यानंतर पोलिसांनी बागवे यांच्या खिडकीतून बाहेर बघितले असता आरोही रक्ताच्या थारोळ्यात चौथ्या मजल्याच्या सज्जावर उताणी पडलेली आढळली. पोलिसांनी स्थनिकांच्या मदतीने तिला बाहेर काढून उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोही ही दुपारी घरात सर्वजण झोपलेले असताना घरातून बाहेर पडली, तेथून ती चालत चालत गच्चीवर गेली. गच्चीवर असलेल्या पत्र्यावरून चालत ती चौथ्या मजल्यावर असलेल्या सज्जावर पडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -