घरमुंबईअवघ्या दीड वर्षाच्या मुलाने गिळलं हेअर पिन

अवघ्या दीड वर्षाच्या मुलाने गिळलं हेअर पिन

Subscribe

अवघ्या दीड वर्षाच्या मुलाने हेअर पिन गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या मुलावर वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे.

मुलं खेळत असताना त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. पण पालकांकडून दुर्लक्षामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.

रोनित या दीड वर्षाच्या मुलाने घरी खेळता खेळता केसाला वापरणारी टिकटॉक हेअर पिन गिळली होती. त्यामुळे त्याला काहीही गिळताना त्रास होत होता. टिकटॉक हेअर पिन मानेच्या भागात अन्ननलिकेत अडकली होती. त्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या आणि उलटीमधून रक्त पडत होते. त्यानंतर त्याला तातडीने स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. पण, नंतर त्याला परळच्या बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने गुंतागुंतीची आणि किचकट एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया केली आणि ४ सेमी लांबीची पिन काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

- Advertisement -
x ray
हेअर पिनचा एक्स रे

याविषयी वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितलं की, “ही गुंतागुंतीची आणि किचकट शस्त्रक्रिया होती. कारण ती पिन उघडल्याचे दिसत होते. शिवाय, तिचा एक भाग अन्ननलिकेत आणि दुसरा भाग स्वरयंत्रामध्ये गेला होता. कदाचित त्याला आवाज गमवावा लागला असता. पण, डॉक्टरांनी यशस्वी एण्डोस्कोपी करुन त्याला जीव वाचवला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -