घरदेश-विदेशसत्तेत असताना काँग्रेसने काय केले - विनोद तावडे

सत्तेत असताना काँग्रेसने काय केले – विनोद तावडे

Subscribe

१९७२ मध्ये गरिबी हटावच्या घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत काँग्रेस जेव्हा-जेव्हा सत्तेत होती. त्यावेळी त्यांनी गरिबांसाठी काय केले, असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला आहे.

‘जे आपल्या आजीला जमले नाही ते आता कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करायला निघाले आहेत. पण गेल्या १० वर्षांत सत्तेत असताना तुम्हाला का जमलं नाही, असा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला आहे. १९७२ मध्ये गरिबी हटावच्या घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत काँग्रेस जेव्हा-जेव्हा सत्तेत होती. त्यावेळी त्यांनी गरिबांसाठी काय केले? हा एक प्रकारे गरीबांवर काँग्रेसचा अत्याचार आहे आणि त्यांच्या भावनांशी खेळणे आहे. जे प्रत्यक्षात करता येणार नाही, त्याचे नुसते स्वप्न दाखवायचे आणि गरीबीची चेष्टा करायची हेच काम काँग्रेसच्या मार्फत सातत्याने केले जात’, असल्याची टीका तावडे यांनी आज केली.

काय म्हणाले विनोद तावडे

महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या पत्नीला तिकीट द्यायचे होते. मात्र ते देऊ शकले नाहीत आणि नाईलाजास्तव स्वत:ला घ्यावे लागले. कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षाला स्वता:ला लोकसभेचे तिकीट मिळविण्यासाठी अध्यक्षपद देखील गमवावे लागले. ही जी त्यागाची परंपरा काँग्रेसने सुरु ठेवली आहे. ती राजकीयदृष्टया सामान्य माणुस जाणतो आणि ओळखतो अशी टीपणीही तावडे यांनी यावेळी केली.

- Advertisement -

पुणे लोकसभेचा मतदारसंघातील कॉंग्रेसचा उमेदवार अजूनही ठरला नाही, त्यामुळे कॉंग्रेसच्या हायकमांडने २०२४ मधील निवडणुकीचा उमेदवार आताच ठरवुन घ्या. म्हणजे कोणीतरी उमेदवार तेव्हा निवडणुक लढवायला तुम्हाला मिळेल असा, टोलाही तावडे यांनी मारला.

माझे वडील ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी ते अस्वस्थ असतात, विरोधी पक्षात असताना ते शांत असतात या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना तावडे म्हणाले की, शरद पवार साहेबांना शांत स्वास्थ्य मिळाले पाहीजे, ही महाराष्ट्राची तमाम इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षात शांत रहावे आणि आपली प्रकृती सांभाळावी अशा शुभेच्छा आम्ही सुप्रिया सुळे यांना देत आहोत.

- Advertisement -

वाचा – ‘५ वर्षांत संपत्ती एवढी कशी वाढली? राहुल गांधी खुलासा करा’

वाचा – राहुल गांधींचं ट्विट आज पाकिस्तानात हेडलाईनला असेल – भाजप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -