घरमुंबईठाण्यात फक्त १ हजार ३४६ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

ठाण्यात फक्त १ हजार ३४६ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

Subscribe

ठाण्यातील इमारतींवर बसविण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी अभियंते अपुरे पडत आहेत.

ठाण्यात गेल्या ७ वर्षांत १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र या यंत्रणेची काय स्थिती आहे. याबाबतची कोणतीच माहिती पालिकेकडे नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या ठाण्याला अवघे २० अभियंते आहेत, त्यामुळे अपुऱ्या अभियंत्यांचा फटका रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यंत्रणा तपासणीला बसत आहे.

इमारतींना ओसी देण्यापूर्वी प्रकल्पाची खात्री

राज्य शासनाने प्रत्येक इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे सक्तीचे केले आहे. भविष्यातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. २००७-०८ पासूनच कायदा करण्यात आला असला तरी सुद्धा ठाण्यात २०१२-१३ पासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुमारे ३०० स्के. फूट प्लॉटला हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीला ओसी प्रमाणपत्र देण्याअगोदर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आला आहे की नाही याची पालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्यांकडून तपासणी केली जाते. त्यानंतरच इमारतीला ओसी दिली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याणमधील एपीएमसी मार्केटला पूराचा फटका


तपासणीसाठी अभियंत्यांचा तुटवडा

ठाण्यात आतापर्यंत १ हजार ३४६ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. एकदा ही यंत्रणा इमारतीत बसविल्यानंतर त्या इमारतीतील रहिवाश्यांनी देखभाल दुरुस्ती करायची आहे. मात्र आतापर्यंत लावण्यात आलेली यंत्रणा किती सुस्थितीत आहेत? किती बंद आहेत? याची माहिती पालिकेकडे नाही. कारण महापालिकेकडून एकदा तपासणी केल्यानंतर पुन्हा तपासणी केली जात नाही. पालिकेकडे एकूण २० अभियंते आहेत. मात्र पालिकेतील पाणी पुरवठ्याची दैनंदिन कामे असतात, त्यामुळे ही यंत्रणा तपासणीसाठी अभियंते अपुरे असल्याचे एका अधिकाऱ्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

वर्ष          इमारती

२०१२-१३ – १८५
२०१३-१४ – २१२
२०१४-१५ – १५७
२०१५-१६ – १७९
२०१६-१७ – ५५
२०१७-१८ – ३५९
२०१८-१९ – १८३
मे २०१९ पर्यंत – १६

- Advertisement -

अभियंत्याची संख्या

कार्यकारी अभियंता – ०४
उपअभियंता – ०७
कनिष्ठ अभियंता – ०९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -