घरमुंबईकल्याण परिमंडळातील प्रलंबित बदली प्रस्तावाविरोधात

कल्याण परिमंडळातील प्रलंबित बदली प्रस्तावाविरोधात

Subscribe

पत्रव्यवहार अनेकवेळा करूनही कल्याण परिमंडळ प्रशासनाकडून त्यावर कोणतही कारवाही करत नाही. त्यामुळे कृती समितीचा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र कल्याण परिमंडळातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे बदली प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत. त्याविरोधात वीज कर्मचारी, अधिकारी,अभियंता कृती समितीने दंड थोपटले आहे. येत्या आठवडाभरात हे आदेश पारित न केल्यास कल्याण परिमंडळाच्या तेजश्री कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा कल्याण परिमंडळचे मुख्य अभियंता रफिक शेख याना एक निवेदनाद्वारे दिला आहे.

कृती समितीने केला आरोप

कल्याण परिमंडळ अंतर्गत अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे बदली प्रस्ताव यासंदर्भात प्रत्येक संघटनेने वेळोवेळी भेटून माहिती दिली असतानाही त्याबाबत संभ्रम कायम आहे. राज्यातील इतर सर्व परिमंडळात बदलीचे आदेश पारित करण्यात आले असताना कल्याण परिमंडळ प्रशासनाने कर्मचारी-अभियंत्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत अन्याय केल्याचा आरोप  आहे. तसेच मुख्य कार्यालयाने पारित केलेल्या परिपत्रक ५१४चे उल्लंघनही कल्याण परिमंडळ प्रशासन करीत असल्यामुळे कर्मचारी, अधिकारी अभियंत्यांमध्ये असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

तेजश्री कार्यालयासमोर धरणे आंदोलन

याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही कल्याण परिमंडळ प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाईलाजास्तव येत्या २० ऑगस्टला कृती समितीतर्फे कल्याणातील तेजश्री कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण परिमंडळात गेल्या दोन आठवड्यात लागोपाठ २ वेळा पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामूळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रखडलेल्या बदल्यांमुळे अनेक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांची वाणवा असून, त्याचा नाहक त्रास महावितरणच्या ग्राहकांना होत असल्याचेही कृती समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

“कल्याण परिमंडळातील बदल्यांबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल” – रफीक शेख, मुख्य अभियंता, कल्याण परिमंडळ, महावितरण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -