घरमुंबईमुंबईत फक्त 30 बेकायदा मंडप, 19 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबईत फक्त 30 बेकायदा मंडप, 19 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

Subscribe

मुंबई शहर भागात एकही बेकायदेशी मंडप नसून उपनगरात 30 मंडप बेकायदा असून, त्यातील रस्त्यावरील 20 मंडपांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईत फक्त 30 मंडपच बेकायदा असल्याचा दावा, मुंबई महपालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. मुंबई शहर भागात एकही बेकायदेशी मंडप नसून उपनगरात 30 मंडप बेकायदा असून, त्यातील रस्त्यावरील 20 मंडपांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित मंडपांवरील कारवाई लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेने उच्च न्यायालयात दिले आहे.

मुंबई शहर विभागात एकही बेकायदेशीर मंडप नाही. तर उपनगरांत रस्त्यांवरील 20 बेकायदेशीर मंडपांवर कारवाई केल्याचे सांगितले. तसेच बेकायदेशीर मंडपांच्या यादीतील 44 मंडप हे खासगी मालमत्तेत असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई झालेली नाही, अशी माहिती पालिकेकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. उपनगरांत केवळ 258 मंडपांना परवानगी दिल्याचेही पालिकेने न्यायालयात स्पष्ट केले. मुंबई शहर भागात 132 तर उपनगरात 547 पैकी 264 बेकायदेशीर गणेशोत्सव मंडप उभारण्यात आले आहेत. त्यावर मुंबई महापालिकेने कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने पालिकेला पुढील कारवाईचा सविस्तर अहवाल बुधवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

उपनगरातील बेकायदेशीर मंडपांची संख्या दोन दिवसांत 217 वरून 264 वर पोहचल्याचे यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्दशनास आणण्यात आले. यावर पालिका प्रशासनाने बेकायदेशीर मंडपांना परवानगी दिली असेल, तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही. बेकायदेशीर मंडपांना परवानगी देणार्‍या पालिका आयुक्तांवर अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल, अशी तंबी उच्च न्यायालयाने शुक्रवारी पालिकेच्या वकिलांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -