घरमुंबईCrystal Tower Fire: जखमींच्या श्वसनयंत्रणेला त्रास

Crystal Tower Fire: जखमींच्या श्वसनयंत्रणेला त्रास

Subscribe

परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर पाच जखमींच्या श्वसनयंत्रणेला त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

परळच्या क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला तर, अनेक जण जखमी झाले. त्यापैकी आता ५ जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, उरलेल्या जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धूर आणि आग अशा दोन्हीच्या दाहाने बहुतेकांच्या श्वसनयंत्रणेला त्रास झाला आहे. आगीचा दाह आणि उष्ण धुराचे लोट यामुळे फुप्फुसाला मोठ्या प्रमाणात इजा झाली असल्याचे रुग्ण सांगतात. त्यामुळे आणखी काही दिवस ५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.

याविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, तिघे जण एमआसीयू विभागात असून यातील एक जण व्हेंटिलेटरवर आहेत. यातील तिघांची प्रकृती सुधारली आहे. अग्निशमन दलाच्या दोन्ही जवानांची प्रकृती स्थिर आहे. तसेच, वॉर्ड क्रमांक ९ मधील दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृतीही स्थिर आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल. तर, मेडिसिन वॉर्डमधील दोघेही स्थिर आहेत. वीणा संपत यांच्या कुटुंबियांच्या विनंतीमुळे रुग्णालयातच ठेवण्यात आले असून त्याही स्थिर असल्याचेही डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

केईम रुग्णालयात सध्या ५ जण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. धुरामुळे आणि आगीमुळे फुप्फुसातील आतील भागाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -