घरमनोरंजनअभिनेत्री गौरी किरणशी Facebook गप्पा!

अभिनेत्री गौरी किरणशी Facebook गप्पा!

Subscribe

पुष्पक विमान फेम अभिनेत्री गौरी किरण हिने पहिल्याच चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव घेतला आहे. पत्रकार आणि मूर्तीकार असलेली गौरी उत्तम अभिनेत्रीही आहे हे तिने तिच्या चित्रपटाच्या यशावरून सिद्ध केले. त्यासाठी तिला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली.

अभिनय क्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी कोकणातून आलेल्या आणि नुकतेच पुष्पक विमान या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या नवोदित अभिनेत्री गौरी किरण हिने माय महानगर च्या फेसबुक लाईव्हमध्ये उपस्थित राहून मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी आपल्या दापोली येथील अनेक गमती जमती, अभिनयाची आवड सुरू होण्याची आठवण, मुंबईतील स्ट्रगलचा काळ आणि सोबत अनेक किस्से या निमित्ताने आपल्या चाहत्यांशी शेअर केल्या.

आपल्या आईकडून अभिनयाची देणगी मिळाल्याचे गौरी सांगते. मात्र ही कला केवळ आवडीपुरती न जोपासता त्यातच करिअर करायचे गौरीचे मनाशी पक्क केलं आणि आठ वर्षांपूर्वी ती मुंबईत आली. स्वप्नांची नगरी असलेल्या या शहरात तिला राहण्यापासून ते कामं मिळवण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागला. मात्र अफाट मेहनत, कामावरील फोकस, दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर गौरीने कला क्षेत्रात अभिनय करण्याचे कामं सातत्याने सुरू ठेवले. अखेर तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आला.

- Advertisement -

पाहुया गौरीची संपूर्ण मुलाखत …

FB Live : Pushpak Viman fame Gauri Kiran with 'Apal Mahnagar ani Me'

FB Live | पुष्पक विमान फेम अभिनेत्री गौरी किरण सोबत 'आपलं महानगर आणि मी' फेसबुक लाईव्ह… तुम्हीही व्हा सहभागी आणि विचारा आपले प्रश्न थेट… | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Friday, August 24, 2018

गावात छोट्या- मोठ्या समारंभांत नृत्य आणि अभिनय करणारी गौरी आज मराठी सिनेसृष्टीत आली असली तरी तिने तिच्या गावाशी असलेली नाळ तुटू दिली नाही, हे तिच्या बोलण्यातून सातत्याने जाणवते. सिनेसृष्टीत येण्याची इच्छा असलेल्यांना गौरीने धीर-संयम बाळगण्याचा आणि माणचं ओळखण्याचा सल्ला दिला आहे. या गप्पांमध्ये गौरी सादर केलेलं लोकगीत ती एक उत्तम गायक असल्याच सिद्ध करते. आपल्या करिअरसाठी नवरा किरणसोबतच आपल्या सासूच्या पाठबळासाठी धन्यवाद द्यायलाही गौरी विसरत नाही. अभिनयासोबतच उत्तम पत्रकार आणि मूर्तीकार असलेल्या गौरीने तिच्या अनेक आठवणी माय महानगरच्या प्रेक्षकांसमोर मांडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -