घरमुंबईमुलींमध्येही आढळतेय पेन हुक्का; ‘महानगर’च्या तपासात शाळांची माहिती

मुलींमध्येही आढळतेय पेन हुक्का; ‘महानगर’च्या तपासात शाळांची माहिती

Subscribe

शिक्षण क्षेत्रात खळबळ उडविणार्‍या ‘महानगर’च्या पेन हुक्काच्या वृत्तानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा आणि कॉलेजांतील मुलींकडून सर्रास पेन हुक्का वापरला जात असून हे प्रमाण लक्षणीय असल्याचे शिक्षकांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

शिक्षण क्षेत्रात खळबळ उडविणार्‍या ‘महानगर’च्या पेन हुक्काच्या वृत्तानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा आणि कॉलेजांतील मुलींकडून सर्रास पेन हुक्का वापरला जात असून हे प्रमाण लक्षणीय असल्याचे शिक्षकांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. दरम्यान, पेन हुक्का आणि इतर व्यसनाधीनतेसाठी या विद्यार्थ्यांकडून सोशल नेटवर्किंग साईटचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी आता शिक्षकांनी नवी मोहीम सुरु केल्याची माहितीही समोर आली आहे.

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पेन हुक्काच्या जाळ्यात अडकल्याचे धक्कादायक वृत्त ‘महानगर’ने नुकतेच समोर आणले होते. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील अनेक शिक्षक पुढे आले असून पेन हुक्का बरोबर इतर व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आमची दमछाक होत असल्याचे हे शिक्षक सांगत आहेत. तर हे व्यसन करताना अनेक विद्यार्थ्यांकडून हायटेक तंत्राचा वापर केला जात असल्याची माहितीही मिळाली आहे. विशेष म्हणजे, याची माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सोशल नेटवर्किंग साईटचा वापर केला जातो. यात वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस, ग्रुप तयार करण्यात येतात. या ग्रुपमध्ये हुक्का पार्लरसंदर्भातील माहिती, किंमत आणि कोणकोणत्या चवीत उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यात येते.

- Advertisement -

त्याचबरोबर यासंदर्भातील फोटोही पोस्ट करुन त्यांना आर्कषित केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
याबद्दल माहिती देताना दक्षिण मुंबईतील एका शाळेतील शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सध्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पेन हुक्काच्या तक्रारी वाढल्या आहेत. आम्ही हे थांबविण्यासाठी समुपदेशकांची मदत घेत आहोत. त्याचबरोबर पालकांची सभा घेऊन त्यांना देखील कल्पना देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर मुलांप्रमाणे मुलींमध्येदेखील हे प्रमाण असल्याची बाब आमच्या तपासात समोर आली असून त्यांना कशाप्रकारचे वाचविता येईल,यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर सोशल नेटवर्किंग साईटवर पेन हुक्का सारख्या गोष्टी सहज उपल्बध होत असून , ते थांबविणे आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -