घरमुंबईभांडुपच्या विद्यार्थी-शिक्षकांची पूरग्रस्तांना 88 हजारांची मदत

भांडुपच्या विद्यार्थी-शिक्षकांची पूरग्रस्तांना 88 हजारांची मदत

Subscribe

भांडुप पश्चिम येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाने मिळून 88 हजार, 450 रुपयांची मदत केरळमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसेवा दलाकडे सुपूर्द केली आहे.

भांडुप पश्चिम येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाने मिळून 88 हजार, 450 रुपयांची मदत केरळमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसेवा दलाकडे सुपूर्द केली आहे. आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्ट रोजी केरळमधील पूरग्रस्तांसाठी भांडुप परिसरात मदत फेरी काढली होती. पन्नास डब्यांतून ही मदत गोळा करण्यात आली होती. राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्रीय महामंत्री सिरत सातपुते, मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, आदर्श विद्यालय चालविणारे कर्नाटक युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय माने , संस्थेशी संबंधित आणि जनता दलाचे ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार सदानंद अपर्णा दळवी, ज्योती बडेकर आदींच्या उपस्थितीत बुधवारी हे डबे उघडण्यात आले. त्यात एकूण 63 हजार 450 रुपये गोळा झाले होते.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी एक दिवसाचे आपले वेतन देण्याचा निर्णय घेतल्याने या निधीत 15000 रुपयांची भर पडली. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाकडूनही 10, 000 रुपये देण्याची घोषणा विजय माने व संजीवकुमार यांनी केली. त्यामुळे एकूण 88,450 रुपये संस्थेचे अध्यक्ष विजय माने तसेच संस्थेशी संबंधित संजीवकुमार यांनी राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्रीय महामंत्री सिरत सातपुते यांच्याकडे सुपूर्द केला.

- Advertisement -

हा निधी केरळमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी वापरण्यात येईल, असे सिरत सातपुते यांनी यावेळी जाहीर केले.सेवा दलाचे विश्वस्त जॉर्ज जेकब व केरळचे कार्याध्यक्ष विजय राघवन चेलिया यांच्या नेतृत्वाखाली संघटनेतर्फे केरळमध्ये मदत कार्य सुरू आहे. यासाठी प्रारंभी मुंबईहून औषधे, महिलांसाठी सॅनिटरी पॅड असे साहित्य पाठविण्यात आले. मात्र आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यावर भर देण्यात येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. केरळमधील पुरात घरादारातून पाणी शिरल्यामुळे इतर नुकसानीबरोबर विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके तसे इतर शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा निर्णय सेवा दलाने घेतल्याचे त्या म्हणाल्या. आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक करताना इतर शाळांनीही अशी मदत गोळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -