घरमुंबईनागरिकांचा संताप, पाकिस्तानी उत्पादनांची होळी!

नागरिकांचा संताप, पाकिस्तानी उत्पादनांची होळी!

Subscribe

पाकिस्तानला धडा शिकविण्याचा एक भाग म्हणून पाकिस्तानशी कोणताही व्यापार करू नये तसेच त्यांची उत्पादने विकू किंवा खरेदी करू नयेत, असे आवाहन.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष श्री. सचिनभाऊ अहिर यांच्या आदेशानुसार मुंबई सरचिटणीस श्री. विजय देसाई, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. साजिद सय्यद, उत्तर-पश्चिम जिल्हा सरचिटणीस श्री. अजित चव्हाण, तालुका पदाधिकारी श्री. इक्बाल खान, श्री. विक्रम चव्हाण व शेकडो कार्यकर्त्यांनी आज अंधेरी मार्केट येथे पाकिस्तानी मसाले व इतर उत्पादनांची होळी करून पाकिस्तानचे कोणतेही उत्पादन खरेदी करू नये किंवा वापरू नये असे आवाहन नागरिकांना केले. तसेच व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानी उत्पादने विकू नयेत असे देखील आवाहन केले.

पाकिस्तानच्या उत्पादनांवर बहिष्कार

काश्मीर भारतापासून वेगळा करून पाकिस्तान मध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान वर्षानुवर्ष दहशतवादाला खतपाणी घालून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, जवान व पोलिस अशा हल्ल्यांत शहीद झाले आहेत. नुकत्याच पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. भ्याड हल्ल्यास प्रत्त्युत्तर म्हणून आपल्या भारतीय सैन्याने यशस्वीरित्या सर्जिकल स्ट्राईक केले. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला धडा शिकविण्याचा एक भाग म्हणून पाकिस्तानशी कोणताही व्यापार करू नये तसेच त्यांची उत्पादने विकू किंवा खरेदी करू नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -