घरमुंबईमाहीमनजीक जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

माहीमनजीक जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Subscribe

सेनाभवनसह माहीम ते प्रभादेवीपर्यंत पाणीबाणी

माहीम, रेतीबंदर येथे शनिवारी दुपारच्या सुमारास भूमिगत ५७ इंची जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे रस्त्यावर वीतभर पाणी जमा झाले. लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच, दादर सेनाभवन, कृष्णकुंजसह माहीमपासून ते प्रभादेवी पर्यंत पाणीपुरवठयावर परिणाम झाला. तसेच या घटनेचा परिणाम हा गॅस पुरवठ्यावरही झाला. सतर्कतेचा उपाय म्हणून काही कालावधीसाठी महानगर गॅस लिमिटेडच्या वाहिनीचा पुरवठाही काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता.
जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिका जलाअभियंता खात्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांचे पाण्यासाठी काही प्रमाणात हाल झाले.
माहीम, दादर, प्रभादेवी, लोअर परळ आदी परिसरात ५७ इंच व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र माहीम ( पश्चिम) रेतीबंदर येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जलवाहिनी अचानक फुटली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -