घरमुंबईकाँग्रेसचे सरकार येते तेव्हा भ्रष्ट्राचार, महागाई वाढते - पंतप्रधान मोदी

काँग्रेसचे सरकार येते तेव्हा भ्रष्ट्राचार, महागाई वाढते – पंतप्रधान मोदी

Subscribe

काँग्रेस हे कन्फ्युजन (संभ्रम)चे दुसरं नावं झाली आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

काँग्रेसला संपवून टाकले पाहिजे असे महात्मा गांधी यांनी सांगितली होते. त्या काँग्रेसला ४४ जागा मिळतील किंवा ४० वरच थांबेल असा सर्वे सांगतो. येणारी पाच वर्षे भारतासाठी महत्वाची आहेत. काँग्रेस हे कन्फ्युजन (संभ्रम)चे दुसरं नावं झाली आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज, शुक्रवारी मुंबईतील बीकेसी येथे महायुतीच्या सभेमध्ये मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

- Advertisement -

मुंबईतील सर्वसामान्यांना मोदींचे भावनिक आवाहन

मुंबईतील कोळी बांधव, डबेवाले तसेच देशाच्या मध्यमवर्गीयांचे विशेष आभार मानत सर्वसामन्यांना मोदींनी भावनिक आवाहन केले. मुंबईतील बिकेसी येथे भाजपाची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मोदींनी सर्वसामान्यांच्या भावनांना हात घातला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी कोळी बांधवांचे आभार मानत असून, मुंबईचे डबेवाले कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना उपाशी न ठेवल्याने त्यांचे देखील आभार मानत आहे. एवढेच नाही तर मुंबईतील टॅक्सीवाले यांचे देखील आभार मोदींनी मानले. तुमच्या प्रामाणिकपणामुळे हा चौकीदार गरीब कल्याणासाठी देशाच्या निर्माणासाठी चांगले काम करू शकला असे पतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

मी छत्रपतींचा मावळा 

दरम्यान पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी छत्रपतींचा मावळा असल्याचे सांगत आता आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार. जे आम्ही बोललो आणि करुन दाखवलं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत. एवढच नाही तर काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री बदलले जायचे. आम्ही ही संस्कृती बदलून टाकली. आता दहशतवाद्यांनी काही केले तर त्यांना पाताळातूनही शोधून मारु. दहशतवादाला मोदी संपवू शकतो असे वाटते तर एनडीएला मतदान करा. सरकारचे हात मजबूत करा असे आवाहन मोदींनी यावेळी केले. तसेच काँग्रेसच्या काळात लोकसभा निवडणुकीच्यावेळी आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत हलवावे लागले होते. पण आता नवरात्री झाली. लोकसभा निवडणूकाही सुरु आहेत आणि आयपीएलचे सामनेही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यास अयोध्येत भव्य राम मंदिर बांधणार आणि देशाचा विकास करणार असल्याचे सांगितले. तसेच राहुल गांधी प्रचारासाठी मुंबईत येत नाहीत. इकडे फिरकतच नाहीत. राहुल आणि शरद पवारांची एकही मुंबईत सभा झाली नाही. कोण आधी कोण नंतर यावर त्यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे मनाने एकत्र नसलेले लोक एकत्र सरकार बनविणार कसे?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रात वाघ सिहांची जोडी एकत्र असल्याचे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. तसेच जंगलामध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीत कोल्हे लाडगे पोपट एकत्र आले. आणि सिहांवर आरोप करू लागले पण त्यांना माहीत नाही जंगलामध्ये वाघ आणि सिंह एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०१४ ची निवडणूक आम्ही मोदींच्या नावावर जिकली आणि आताची मोदींच्या कामावर जिंकणार असे त्यांनी सांगितले.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे – 

  • काशीमध्ये मी माझा आज उमेदवारी अर्ज भरून आलो
  • देशाच्या सांस्कृतिक नगरमध्ये मी अर्ज भरला आणि सामृद्धीक शहरात मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईत आलो
    भारताची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे
  • विकल्प नाही तर हे संकल्पाची निवडणूक आहे
  • गरिबी हटाओचे आश्वासन देणारी निवडणूक नाही तर त्यांना सशक्त करण्याची निवडणूक आहे
  • आता जी लहर आहे त्यामुळे अनेकांना काय सुरू आहे ते कळत नाही
  • नवीन मतदार मोदींसोबत का उभा आहे हे त्यांना कळत नाही
  • भारताची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे
  • नवीन मतदार हा आपल्या स्वप्नासोबत उभा आहे
  • देशाचा युवक २०४७ कडे बघत आहे. जेव्हा भारत स्वातत्र्यांची शंभरी साजरी करणार आहे
  • भाजपा पूर्ण बहुमतचे सरकार बनवेल असे सर्व्हे येत आहेत. लोकसभेत भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळतील
  • भाजपा आणि एनडीए सगळ्यात जास्त जागा जिंकून सत्तेत येईल असे सर्वे सांगत आहेत
  • २०२२ पर्यंत बेघरांना पक्के घर देण्याचा संकल्प आम्ही केला आहे
  • काँग्रेसचे उमेदवार म्हणतात मिडल क्लास लालची आहेत आणि सेल्फीश आहेत असे म्हणता
  • सर्व सामान्यांसाठी एकही गोष्ट काँग्रेसने सांगितली नाही
  • काँग्रेस मिडल क्लासवर बोजा टाकत आहे
  • काँग्रेसचे सरकार येते तेव्हा भ्रष्ट्राचार, महागाई आणि जास्त कर वाढतो
  • भ्रष्टाचारामुळे काही लोक जेलमध्ये गेले तर काही बेलवर आहेत
  • २०१९ पुन्हा सत्तेत बसवा त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवू
  • मी छत्रपतींचा मावळा आहे
  • आतंकी हल्ल्यानंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बदलण्याची परंपरा आम्ही मोडीत काढली.
  • आम्ही आतंकवाद्याना घरात घुसून मारलं
  • निवडणूका असतानादेखील आयपीएल सुरू आहे
  • नाहीतर हे तेव्हा सांगायचे की निवडणुका आहेत पोलीस कामाला लागले. त्यामळे आयपीएल आफ्रिकेत खेळा म्हणायचे
  • पण याच मोदीच्या काळात सर्व सुरळीत सुरू आहे
  • कुणी ८ जागा लढत आहे, कुणी २० जागा तर कुणी ४० जागा लढत आहे आणि म्हणतात की आमच्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान करा
  • पण यापैकी कोणता पंतप्रधान आतंकवाद्यांना घरात घुसून मारेल, असे तुम्हाला वाटतं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -