घरमुंबईPMC Bank Scam: प्रॉपर्टी आणि दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाले जुनैद खान

PMC Bank Scam: प्रॉपर्टी आणि दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाले जुनैद खान

Subscribe

जॉय थॉमस यांनी बँकेतील सहकारीसोबत लग्न करण्यासाठी चक्क धर्मांतर केले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यात ९ फ्लॅट विकत घेतले.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस सध्या अटकेत आहेत. या घोटाळ्याची चौकशी आर्थिक आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. या चौकशीदरम्यान जॉय थॉमस यांच्या नावे पुण्यात दहा ठिकाणी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जॉय थॉमस यांनी जुनैद खान या नावाने ही मालमत्ता जमवली होती. दुसरा विवाह करण्यासाठी जॉय थॉमस यांनी धर्मांतर केले असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील कोंढवा येथे थॉमस यांनी ९ फ्लॅट आणि एक व्यावसायिक गाळा खरेदी केला आहे. २०१२ साली थॉमस आणि त्यांची दुसऱ्या पत्नीने ही मालमता खरेदी केली होती. थॉमसची दुसरी पत्नी ही पुर्वाश्रमीची त्यांची बँकेतीलच सहाय्यक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जॉय थॉमस आणि त्याच्या पत्नीने २०१२ साली पुण्यात फ्लॅट विकत घेतल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले आहे. याच काळात एचडीआयएलच्यावतीने राकेश आणि सारंग वाधवान यांनी कर्जाचा परतावा न करता आणखी बेकायदेशीर मार्गाने कर्ज काढले होते.

- Advertisement -

घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, “पुण्यातील दहा मालमत्ता या थॉमस आणि त्याची पत्नी दोघांच्याही नावाने आहेत. मात्र त्यातील थॉमस यांचा शेअर किती आहे? हे अजून कळलेले नाही. पुढील तपासात जर हे फ्लॅट घेण्यासाठी घोटाळ्यातील रक्कम वापरल्याचे निदर्शनास आले तर या मालमत्तांवरही टाच आणली जाईल”

जॉय थॉमस याने आपली बँकेतील सहकारीसोबत लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. २००५ साली त्याने दुसरे लग्न केले. त्यानंतर पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला, सध्या हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावानेही थॉमस यांची ठाणे येथे मालमत्ता असल्याचे समोर आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -