घरमहाराष्ट्र'आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना'; अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’; अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जसजशी वाढत आहे. तसतशी राजकीय नेत्यांची एकमेकांवरील टीका टिपण्णीही वाढत आहे. जाहीर सभांमधून विरोधकांना लक्ष करणाऱ्या नेते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही खडेबोल सुनवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप सरकारवर टीका केली आहे. यावेळी राज्यातील प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले असून याला सरकारच जबाबदार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. रस्त्यांवरील खड्डे, गॅस, वीज, अन्न-धान्य यांच्यासंबंधीत समस्यांवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

- Advertisement -

ट्विटरवॉर सुरूच 

विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर राजकीय पक्षांच्या सभांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यापूर्वीही अजित पवार यांनी भाजपाल जसाच तचे उत्तर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आम्हाला विरोधक नसल्याचे सभांमध्ये म्हटले आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यंदाची निवडणूक रंगत नाही, कारण विरोधकच उरले नाहीत, असे वक्तव्य केले होते. याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला. त्यांनी सरकारवर टिका करताना जर विरोधकच उरले नसतील तर पंतप्रधानांच्या १०, अमित शहांच्या २० आणि मुख्यमंत्र्यांचा १०० सभा का घ्याव्या लागत आहेत, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा –

PMC Bank Scam: प्रॉपर्टी आणि दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाले जुनैद खान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -