घरमुंबईअभिनेत्रीला अश्लील संदेश पाठवणारा गजाआड

अभिनेत्रीला अश्लील संदेश पाठवणारा गजाआड

Subscribe

अभिनेत्रीला अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक.

भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या एका आरोपीला पकडण्यात आले आहे. संदिप पांडे (३४) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी अभिनेत्रीला तिच्या व्हॉट्अॅप आणि फेसबुक अकाऊंटवर अश्लील संदेश पाठवत होता. याप्रकरणी अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संदीप पांडे या आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

ही अभिनेत्री भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत असून तिचा नवरा उद्योगपती आहे. काही महिन्यापासून आरोपी संदीप या अभिनेत्रीला व्हॉट्अॅप आणि फेसबुक अकाऊंटवर अश्लील संदेश पाठवायचा. अभिनेत्रीच्या नवऱ्याने एक दिवस तिचे फेसबुक अकाऊंट चेक केले असता ते अश्लील संदेश त्यांने पाहिले. त्यानंतर अभिनेत्रीच्या नवऱ्याने संदीपला फोन करुन समजावले मात्र त्यांनी उद्धटपणे बोलत अभिनेत्रीच्या पतीलाच धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने संदीप पांडे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोण आहे संदीप?

संदीप पांडे हा एक मॅकेनिक आहे. त्याच्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -