घरमुंबईफिनिक्सच्या पीव्हीआरमध्ये मनसेचा राडा

फिनिक्सच्या पीव्हीआरमध्ये मनसेचा राडा

Subscribe

मनसेने मल्टिप्लेक्समधील बाहेरून खाद्यपदार्थ न नेण्याविरोधात फिनिक्स मॉलमधील पीव्हीआरमध्ये राडा केला आहे. संदीप देशपांडेने यावेळी इशारा दिला आहे.

मल्टिप्लेक्समध्ये १ ऑगस्टपासून प्रेक्षकांना बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार होते. शिवाय मल्टिप्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थही छापील किंमतीतच मिळणार होते. राज्यसरकारकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले होते मात्र राज्य सरकारच्या या अध्यादेशाचे अद्यापही पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळं मनसेनं फिनिक्स मॉलच्या पीव्हीआरमध्ये हल्लाबोल केला आहे. संदीप देशपांडे, संतोष धुरी या मनसे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात जाऊन सामोसा खाल्ला असून चित्रपट बघण्यासाठी हे नेते आत गेले.

- Advertisement -

वाचा – मल्टिप्लेक्सच्या मालकांना मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा!

पोलिसांवर ओढले ताशेरे

संदीप देशपांडे यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. पोलीस प्रशासन राज्य सरकारचा आदेश पाळत नसून पीव्हीआरच्या मालकांचा आदेश पाळत असल्याचा आरोप यावेळी मनसे नेत्यांनी लावला आहे. इतकंच नाही तर, पोलीस नीट काम करत नसल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान चित्रपट पाहताना इतर कोणत्याही प्रकारचा खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्सच्या स्टॉलमधून आत आल्यास, आम्ही तसं होऊ देणार नाही. जर बाहेरून आणणेला पदार्थ खायला परवानगी देण्यात येणार नसेल तर, स्टॉलवरील पदार्थही आतमध्ये येऊ देणार नाही असा इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -