घरमुंबईदिल्लीपेक्षा 'बीकेसी' अधिक प्रदूषित

दिल्लीपेक्षा ‘बीकेसी’ अधिक प्रदूषित

Subscribe

मुंबईतील अनेक भागांमध्ये धुरके दाटून आले असतानाच वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) ही दिल्लीहून अधिक प्रदूषित झाली असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर पोहोचली असल्याचे आपण पाहिले होते. मात्र, आता दिल्लीला देखील मुंबई शरहारातील ‘बीकेसी’ने मागे टाकल्याचे समोर आले आहे. सध्या मुंबईचा पारा उतरु लागल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये धुरके दाटून आले होते. त्यातच वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) बुधवारी दिल्लीहून अधिक प्रदूषित झाले होते. तर १० -१२ दिवसांपासून नवी मुंबईतील प्रदूषणाची धोकादायक पातळीही कायम आहे. त्यामुळे आज, गुरुवारी देखील नवी मुंबई आणि बीकेसीतील ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तरंगत्या धुलिकणाचे प्रमाण सर्वाधिक

थंडीच्या कालावधीत हवेचा वेग कमी असतो. त्यामुळे अशावेळी प्रदूषके हवेच्या खालच्या थरात साचू लागतात. तीन चार दिवसांपासून मुंबईत गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे शरहरातील अनेक ठिकाणी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत आणि सूर्यास्तानंतर धुरके दाटून येते. या धुरक्यात प्रामुख्याने तरंगत्या धुलिकणाचे प्रमाण सर्वाधिक असते. ‘बीकेसी’ हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे ठिकाण असून कलानगर जंक्शन येथून दररोज वर्दळीच्या वेळी तासाला १५ ते १६ हजार वाहने ये – जा करतात. त्यामुळे परिसरात इतर वेळीही सर्वाधिक प्रदूषणाची नोंद होते.

- Advertisement -

असे आहे प्रदूषण

भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या ‘सफर’ उपक्रमाने बुधवारी बीकेसीमध्ये तरंगत्या धुलिकणाचे (पीएम २.५) प्रमाण प्रति घनमीटर हवेत ३१३ मायक्रोग्रॅम नोंदवले आहे. तर दिल्लीतील सरासरी (पीएम २.५) ३१२ मायक्रोग्रॅम होती. नवी मुंबईत हे प्रमाण २३९ मायक्रोग्रॅम होते.


हेही वाचा – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार, पण सत्तास्थापना अजूनही लांबच!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -