घरमहाराष्ट्रआता दिल्लीत फार काम नाही, घडामोडी मुंबईतच - संजय राऊत

आता दिल्लीत फार काम नाही, घडामोडी मुंबईतच – संजय राऊत

Subscribe

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या विषयांपेक्षा देखील दिल्लीत चर्चा आहे ती महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेची. आधी शरद पवारांचं प्रसारमाध्यमांसमोरचं ‘महाशिवआघाडीची कोणतीही चर्चा नाही’ असं वक्तव्य, त्यानंतर पवार-सोनिया गांधी भेट, त्यानंतर पुन्हा संजय राऊत-शरद पवारांची भेट, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट अशा राज्यातल्या सत्तास्थापनेसंदर्भातल्या घडामोडी दिल्लीत घडत होत्या. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र, ‘आता दिल्लीत फार काम नाही, मी पत्रकारांना मुंबईत जायला सांगितलं आहे’, अशी प्रतिक्रिया देऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीतून महाराष्ट्रात सरकल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्लीचा ग्रीन सिग्नल मिळाला!

काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचं सरकार स्थापन होण्यात सोनिया गांधींची मंजुरी हा एक मोठा टप्पा होता. या महाशिवआघाडीसाठी गांधी परिवार तयार नसल्याचं दिसून येत होतं. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीत सरकलं होतं. मात्र, आता दिल्लीत फार काम उरलं नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. म्हणजेच, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडचा ग्रीन सिग्नल महाशिवआघाडीसाठी मिळाला असून आता पुढची सगळी सूत्र मुंबईत हलणार असल्याचंच स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार, पण सत्तास्थापना अजूनही लांबच!

‘राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद? चर्चा झालेली नाही’

दरम्यान, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाट्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संजय राऊतांनी मात्र, ‘त्यासंदर्भात अजून कुणीही चर्चा केलेली नाही’, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘सत्तास्थापनेसंदर्भात दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा झाली आहे. मात्र, ती काय झाली त्यावर मी भाष्य करू शकत नाही. दोन्ही पक्षातल्या नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा देखील केली आहे. येत्या २ दिवसांमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे’, असं राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -