घरमुंबईउल्हासनगर की सिंधूनगर?; पुन्हा भाषिक वाद होण्याची शक्यता

उल्हासनगर की सिंधूनगर?; पुन्हा भाषिक वाद होण्याची शक्यता

Subscribe

उल्हासनगर शहराला सिंधूनगर नाव देण्याचा अशासकीय प्रस्ताव साई पक्षाच्या नगरसेविकेने येत्या सर्वसाधारण सभेत आणला असून त्याला ६ नगरसेवकांनी समर्थन दिले आहे. या प्रस्तावामुळे शहरात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

उल्हासनगर शहराला सिंधूनगर नाव देण्याचा अशासकीय प्रस्ताव साई पक्षाच्या नगरसेविकेने येत्या सर्वसाधारण सभेत आणला असून त्याला ६ नगरसेवकांनी समर्थन दिले आहे. या प्रस्तावामुळे शहरात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत साई पक्षाच्या नगरसेविका कांचन लुंड यांनी उल्हासनगर शहराला सिंधूनगर नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला भाजप नगरसेवक राजा वानखेडे, प्रदीप रामचंदानी, मीना आयलानी, राजू जग्यासी, साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड, रिपाई (आठवले गट) नगरसेवक भगवान भालेराव यांनी समर्थन दिले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उल्हासनगर शहराला सिंधूनगर नाव देण्याच्या बाजूने होते. एका जाहीर सभेत त्यांनी सिंधूनगर नाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे मागणी करू, असे म्हटले होते. याचा उल्लेख करून साई पक्षाच्या नगरसेविका कांचन लुंड यांनी हा अशासकीय प्रस्ताव मांडला आहे.

उल्हासनगर की सिंधूनगर? हा वाद जुनाच

उल्हासनगर की सिंधूनगर हा वाद फार जुना आहे. मराठी भाषिकांचा सिंधूनगर नावाला विरोध आहे. तर सिंधी भाषिक सिंधूनगरची मागणी करीत आले आहेत. १९९० साली तत्कालीन भाजप खासदार राम कापसे हे उल्हासनगर येथील सिंधू युथ सर्कल येथे एका कार्यक्रमात आले असता त्यांनी उल्हासनगरचे नाव बदलून सिंधूनगर नाव देण्याबाबत वक्तव्य केले होते. यावेळी तेव्हाचे शिवसेना शहरप्रमुख रमेश मुकणे, शिवसेना नगरसेवक दिलीप मालवणकर, प्रकाश सावंत, सुरेंद्र सावंत आणि शिवसैनिकांनी कापसे यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करून सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते. मात्र नंतर शासनाने हे गुन्हे मागे घेतले. यानंतर वेळोवेळी या नामांतराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यात मराठी भाषिक आणि सिंधी भाषिक आमनेसामने आले आहेत.

उल्हासनगर शहराचे नामांतर करून काही उपयोग होणार आहे काय ? यापेक्षा शहराच्या विकासावर भर दिला तर ते चांगले होईल.
– राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख
- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला मिळाली पोलीस वसाहतीची सनद

आज उल्हासनगर शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रोज भ्रष्टाचाराचे नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. कोणताही विकास होत नाही. त्यामुळे नामांतराचा भावनिक मुद्दा उपस्थित करून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही उल्हासनगरचे नाव बदलू देणार नाही.
– बंडू देशमुख, मनसे शहरप्रमुख

हेही वाचा – पुरामुळे उल्हासनगरमध्ये १८७५ कुटुंबाचे नुकसान

विधानसभा निवडणुकी जवळ आल्या की अशा मागण्या जोर धरू लागतात. नामांतर करण्यास पुढाकार घेणाऱ्या नगरसेवकांपैकी बहुतेक नगरसेवक हे विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छूक आहे त्यामुळे असा स्टंट करीत आहे. आमचा नामांतराला विरोध असून आम्ही रस्त्यावर उतरून त्याला विरोध करू.
– दिलीप मालवणकर, सामाजिक कार्यकर्ते
- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगर महापालिकेच्या प्रांगणात मनसेचे खड्ड्यांचे अनोखे प्रदर्शन

स्वतः आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे उल्हासनगरला सिंधुनगर नाव देण्याच्या बाजूने होते , आम्ही वेळोवेळी सिंधूनगरची मागणी करीत आलो आहोत, कोणताही वाद न करता अशासकीय प्रस्ताव आम्ही आणला आहे यावर योग्य ती चर्चा होऊन प्रस्ताव मंजूर झाल्यास शासनाकडे पाठवू.
– शेरी लुंड, साई पक्षाचे नगरसेवक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -