घरमुंबईकिशोरी पेडणेकर ठरल्या, सर्वोत्कृष्ट नगरसेविका

किशोरी पेडणेकर ठरल्या, सर्वोत्कृष्ट नगरसेविका

Subscribe

२०१७ - १८ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या प्रगती पुस्तकानुसार दुसरा क्रमांक काँग्रेसच्या श्वेता तर तिसरा क्रमांक भाजपाच्या प्रीती साटम यांना देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या नगरसेवकांमध्ये पहिला क्रमांक शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांना मिळाला आहे. ‘प्रजा फाउंडेशन’ या एनजीओने मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या कामाबाबतचे प्रगती पुस्तक शुक्रवारी मुंबईच्या प्रेस क्लब येथे जाहीर केले. त्यानुसार किशोरी पेडणेकर यांना ‘सर्वोत्कृष्ट नगरसेवकाचा’ प्रथम क्रमांक देण्यात आला. प्रजा फाउंडेशनकडून दरवर्षी नगरसेवकांच्या कामकाजाचे प्रगती पुस्तक जाहीर केले जाते. त्यासाठी आरटीआयच्या माध्यमातून महापालिकेकडून माहिती मागविली जाते. दरम्यान २०१७ – १८ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या प्रगती पुस्तकानुसार दुसरा क्रमांक काँग्रेसच्या श्वेता तर तिसरा क्रमांक भाजपाच्या प्रीती साटम यांना देण्यात आला आहे. निकृष्ट कामगिरी करणारे नगरसेवक म्हणून शाहनवाझ शेख, केशरबेन पटेल आणि गुलनाझ कुरेशी यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

३७ नगरसेवक गुन्हेगार

प्रजा फाउंडेशनच्या प्रगती पुस्तकानुसार मुंबई महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. तर डिसेंबर २०१७ पर्यंत ३७ नगरसेवकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

सत्ताधारी शिवसेना पिछाडीवर

महापालिकेत सर्वात चांगली कामगिरी करणारा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. दुसरा क्रमांक भाजपाला तर पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -