घरमुंबईपनवेलच्या प्रणीत पाटीलची अंतराळ भरारी

पनवेलच्या प्रणीत पाटीलची अंतराळ भरारी

Subscribe

मंगळ मोहीम संशोधनासाठी निवड

नवी मुंबई , सायन्टिस्ट अस्ट्रॉनॉट कँडीडेट प्रणीत पाटील या पनवेलच्या थोर सुपुत्राची नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहिमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. नासाच्या या मंगळ मोहिमेत प्रणित याची निवड झाल्याने पनवेलचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. तर प्रणितमुळे पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.मराठी तरुणांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावणार्‍या प्रणितचा अभूतपूर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले आहे. अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली जिद्द, खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सध्या नासा या आंतराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तो चक्क अवकाशात जाऊन संशोधन करत आहे. आपले काम व यश फक्त स्वतः पुरते मर्यादीत न ठेवता समाजातील इतर युवकांना व विद्यार्थ्यांना तो अंतराळ, रॉकेट व रोबोटिक्स सायन्स आदींचे मोफत मार्गदर्शन करुन त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

प्रणित पाटील याने पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण करून एमएजीएम कॉलेजातून सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग केले. मुंबईत घाटकोपर येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करीत असताना अमेरिकेतील ‘अमेरिकन अलायन्झ’ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळाली. तेव्हापासून तो पत्नी, मुलीसह अमेरिकेत राहतो आहे. ही कंपनी ‘नासा एन्सापयर’ सिस्टिममध्ये सिलीका पुरविण्याचे काम करते. पुढे अंतराळ विषयाची आवड निर्माण झाल्यामुळे त्याने अमेरिकेतील ‘एम्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’ या अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या विद्यापीठात प्रवेश घेतला. २०१६मध्ये ‘थ्री कन्टिन्युइंग एज्युकेशन युनिट इन सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन’ या विषयांत त्याने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘नासा’च्या १६०२ या बॅचमध्ये ‘सायंटिस्ट अस्ट्रोनॉट’ या पदासाठी त्याची निवड झाली. प्रणित पाटील याने जगद्विख्यातद्वैमानिक पॅटी वागस्टाफ यांच्याकडून एरोबॅटिक्सचे प्रशिक्षण घेतले. त्याच्या कामगिरीची दखल घेत २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या मंगळ मोहिमेच्या संशोधनात दोनशे जणांच्या पथकाचा कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची निवड करण्यात आली. त्याने यशस्वीपणे ही संशोधन मोहीम पूर्ण केल्याची माहिती दिली.

- Advertisement -

मंगळावर राहण्याच्या दृष्टीने संशोधन
मंगळ ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास तसेच तिथे राहण्यासाठी वातावरणाची निर्मिती याबाबत या मोहिमेच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. मंगळावर राहण्याचा अनुभव कसा असेल, याचा अभ्यास १२ दिवसांच्या खडतर मोहिमेत करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -