घरमुंबईयुतीच्या पडद्यामागून सोशल मीडियाचे कंत्राट

युतीच्या पडद्यामागून सोशल मीडियाचे कंत्राट

Subscribe

प्रशांत किशोर यांची मातोश्री वारी

जनता दल संयुक्तचे उपाध्यक्ष आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दुपारी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा शिख्वसेना भाजप युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र राज्यात आणि केंद्रात भाजप विरोधी वातावरण असतना पुन्हा युतीसाठी पायघड्या कशाला घालायचा असा सवाल एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना केला. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि एक दोन जागांसाठी युतीची बोलणी का अडवून ठेवली आहेत? असा सवालही किशोर यांनी यावेळी केला. यामुळे ते भाजप आणि शिवसेनेची युती करायला आले होते की आपल्या पदरात सोशल मीडियाचे काही कोटींचे कंत्राट घेण्यासाठी आले होते असा सवाल शिवसेनेच्या नेतेमंडळीकडूनच केला जात आहे.

शिवसेना-भाजप युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुढे सरकत नसल्याने युती केल्यास शिवसेनेचाच फायदा होईल असा दावा किशोर यांनी खासदारांच्या बैठकीत केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुयमंत्री होणे शक्य असल्याचा युक्तीवादही त्यांनी केला.

- Advertisement -

आजकालच्या दुनियेत कुणीही फुकट काम करीत नाही. कट्टर शिवसैनिक सोडून.पक्षासाठी प्रसंगी पदरमोड करुन भगावा झेंडा खांद्यावर घेतील. मात्र काही नेत्यांना दिल्लीत भाजप नेतृत्वाबद्दल उट्टे काढण्यासाठी केवळ दिखावा म्हणून प्रशांत किशोरची ढाल काही मातोश्रीजवळच्या नेत्यांनी पुढे केलेली आहे. तसेच प्रशांत किशोरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता भाजप, जनता दल संयुक्त, काँग्रेस आणि परत जनता दल संयुक्त असा प्रवास करणार्‍या किशोरची विश्वासाहर्तता शिवसेनेसोबत किती राहिल याबाबतही बैठकीनंतर खासदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपच्या नेतृत्वाचा छुपा निरोप घेवून आलेल्या प्रशांत किशोरवर शिवसेनाही विश्वास ठेवायला तयार नाही. मात्र असे असले तरी आपले पत्ते न उघड करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचे युतीबाबतचे आर्जव शांतपणे ऐकन घेतल्याचेही तो नेता म्हणाला. युती झाली तर शिवसेनेच्या जागा भाजपपेक्षा जास्त कशा निवडून येतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा बनेल हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिली आहे.

युवासेना आणि स्वत: आदित्य ठाकरे हे सोशल मीडियाच्या रणनितीवर लक्ष ठेवून असताना काही शेकडो कोटी खर्चून प्रशांत किशोरच्या हाती पक्षाचा सर्व डेटा कसा काय द्याचा असा सवाल आता शिवसेनेकडून केला जात आहे. दुपारी आलेल्या प्रशांत किशोर याने मातोश्रीवर लंच पे चर्चा करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे मन जिंकले.निवडणुकीमध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी मंगळवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर ते आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची डिजीटल रणनीती आखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ‘आपलं महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचा असा कोणताही विचार नाही. 2014 साली मोदींना साथ देणारे, त्यानंतर नितीश कुमार यांना साथ देणारे आणि नंतर काँग्रेसला साथ देणार्‍या प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न सध्या शिवसेनेला पडला आहे. तसेच इकडून तिकडे उड्या मारणारे प्रशांत किशोर शिवसेनेसोबत तरी जास्त काळ राहतील का? असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला. त्यामुळे शिवसेनेचा प्रशांत किशोरवर सध्या तरी भरवसा नाय, असेच म्हणावे लागेल. युतीसाठी शिवसेना 23 आणि भाजप 25 असा फॉर्म्यूला तयार असताना आता लोकसभेसाठी सुद्धा 50-50 अशी मागणी सेनेकडून जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

म्हणून प्रशांत किशोर मातोश्रीवर
मातोश्रीवर एखाद्याने भेट मागितली तर त्याला वेळ देणे ही मातोश्रीची वर्षांनुवर्षे चाललेली परंपरा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे प्रशांत किशोर यांना मातोश्रीवर भेटल्याचे सांगितले जाते. तसेच सध्या शिवसैनिक आणि युवा सैनिक हे स्वतःच सोशल मीडियावर काम करत असल्याने प्रशांत किशोर शिवसेनेची डिजिटल रणनीती आखणार आहेत, या निव्वळ अफवा असल्याचे या वरिष्ठ नेत्याने सांगितले. मातोश्रीवरील बैठकीला खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, गजानन किर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, राहूल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गिते, श्रीकांत शिंदे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित होते.

कोण आहे प्रशांत किशोर
*आठ वर्षे संयुक्त राष्ट्रासाठी काम केले.
*भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी 2014 लोकसभा निवडणुकांसाठी इनोव्हेटिव्ह आणि मार्केटिंग एड कॅम्पेन – चायपे चर्चा, थ्री डी रॅली, रन फॉर युनिटी
*२०१५मध्ये बिहारला नितीश कुमारांच्या विजयात सिंहाचा वाटा.
*२०१५ पॉलिटीकल एक्शन कमिटीचे संस्थापक.
*२०१६ पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत, कॅप्टन अमरींदर सिंह यांच्या विजयाचे शिल्पकार.
*२०१७ मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी त्यांनी काम केले, पण त्याठिकाणी काँग्रेसला अपयश आले.
*१६ ऑक्टोबर २०१८ मध्ये जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.

किशोर यांची केवळ सदिच्छा भेट असल्याने ते शिवसेनेची प्रचार रणनीती सांभाळणार असल्याची चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे. पक्षात प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी नेहमी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असते. शिवसेना नेहमीच आपली रणनिती ठरवत असते. युतीसाठी आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही, हा काही व्यापार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला सक्षम आहेत. हळूहळू आपल्याला सर्वकाही कळेल.
– संजय राऊत, खासदार शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -