घरमुंबईअकरावी प्रवेशाची तयारी अपुरी

अकरावी प्रवेशाची तयारी अपुरी

Subscribe

शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक कक्ष अद्यापही नाही

विलंबाने सुरू झालेली अकरावी प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही कॉलेजांची यादी व कट ऑफ विद्यार्थ्यांना मिळण्यास झालेला विलंब यामुळे विद्यार्थी हैराण झाले होते. परंतु विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाबाबत सविस्तर माहिती सहज मिळावी यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विशेष कक्ष सुरू करण्यात येणार होता. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही हा कक्ष सुरू न झाल्याने अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाची कोणतीच तयारी नसल्याचे दिसून येते.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन दिवसांपर्यंत विद्यार्थी व पालकांना गतवर्षीची कट ऑफ लिस्ट व कॉलेजांची यादी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल याचा अंदाज विद्यार्थी व पालकांना बांधता येत नव्हता. त्यामुळे त्यांना अर्जाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेशादरम्यान येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी उपशिक्षण संचालकांच्या कार्यालयात मार्गदर्शक कक्ष सुरू करण्यात येणार होता.

- Advertisement -

परंतु प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी अद्याप मार्गदर्शक कक्ष उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अडचणींबाबत माहिती मिळण्यात नसल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना नसल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण विभागाने मुंबई महानगर प्रदेशातील 98 कॉलेजांची यादी जाहीर केली. या कॉलेजांमध्ये तब्बल 6622 जागा वाढणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -